आईन्स्टाईनची खोली भाग १

अमेरिकेला पहिल्यांदा गेल्यानंतर जवळजवळ वीस-बावीस वर्षांनी, म्हणजे १९८१  मध्ये शेवटी योग जुळून आला. जाण्यापूर्वी ठरवलं होतं, की गेल्यावर शक्यतो सर्वप्रथम करायचं म्हणजे प्रिन्स्टनमधील आइनस्टाइन राहात ते घर, आणि तिथल्या इन्स्टिट्यूट फॉर अ‍ॅडव्हान्स्ड स्टडीजमधील त्यांची अभ्यासाची खोली या दोन गोष्टी पाहायच्या. आइनस्टाइन म्हणजे माझं दैवत. ज्यूद्वेष्टी नाझी जर्मनी सोडल्यास सार्‍या जगाला वंदनीय असलेली व्यक्ती. त्यांचं वास्तव्य असलेल्या या दोन जागा म्हणजे माझ्या मनातील तीर्थस्थानं  होती, पण या जागांना प्रत्यक्ष भेटीचा योग येत नव्हता, हेच खरं. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, मध्य अगदी सारी अमेरिका पालथी घातली. त्या काळात तिकडे येणार्‍या मित्रांना अमेरिकेतील कितीतरी ठिकाणं स्वत: नेऊन दाखवली. पण या सार्‍या धावपळीत माझं प्रिन्स्टन जाणं राहून गेलं. नाही जमलं. या दरम्यान न्यूयॉर्कला तर आठ-दहा फेर्‍या झाल्या असतील. न्यूयॉर्कहून प्रिन्स्टनला जायला दर अर्ध्या तासाने बस असे आणि सारा प्रवास दीड-दोन तासांचा. पण जाणं राहिलंच. चार-पाच वर्षांनी भारतात परत यायला अमेरिका सोडली. तेव्हा, परत येऊ त्यावेळी ते घर आणि ती खोली अगदी नक्की बघूच बघू असं ठरवलं, इतकंच.

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

This Post Has 3 Comments

  1. “स्वत:बद्दल जरासुद्धा अहंभाव नसणं, हे फार थोर माणसांनाच जमू शकतं. बाकी आपण सारे जण स्वत:लाच बेगडी मोठेपण लावून मिरवतो आणि ते सार्‍या जगाला ठाऊक व्हावं म्हणून कायम प्रयत्नशील असतो.” … thanks a lot for sharing this article with us ! Keep up the good work !!

  2. सुंदर लेख.

  3. खूप छान लेख , एवढ्या मोठ्या व्यक्तींचे असे विचार नक्कीच भारावून टाकणारे आणि शिकण्यासारखे आहेत . 🙏🏻🙏🏻

अभिप्राय द्यायला विसरू नका...

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Close Menu
%d bloggers like this: