एक आगळे विद्यापीठ

पुस्तकपंढरी: जाने/फेब्रुवारी १९९२

पटवर्धनांची आणि माझी ओळख सत्यकथेच्या कचेरीतच एका संध्याकाळी झाली. नक्की आठवत नाही पण अंदाजे ते 1966-67 साल असावं.

दिवाळी नुकतीच संपली होती.

लग्नानंतरची पहिली सहा-सात वर्षं एकत्र कुटुंबात (चर्चगेट म्हणजे गिरगावाच्या जवळ) आमचं वास्तव्य असूनही किंवा असल्यामुळेच ‘सत्यकथा’ हे नाव कानावरून जाण्याचं कारणच नव्हतं. आम्ही दादरला स्वतंत्र बिऱ्हाड केल्यानंतर मी मराठी पुस्तकाचं वाचन करायचा सपाटा लावला. हाती सत्यकथेचे अंकही आले. सत्यकथेचा बोलबाला कानावर पडू लागला. कॉलेजमधल्या फडके-खांडेकरी वाङ्मयाने थबथबलेल्या माझ्या मनासमोर वास्तवतेचं एक अनोखं दालन खुलं झालं. सत्यकथेचं वर्गणीदार व्हायचं, जमल्यास मौजेचं एखादं पुस्तक विकत घ्यायचं असं मी ठरवून टाकलं आणि एका जन्माला की डोहाळजेवणाला  गिरगावात गेले असताना सत्यकथेच्या कचेरीची वाट पुसत पुसत  एका बोळकंडीत  शिरून लाकडी जिन्यानं गिरगाव परिसराला शोभेशाच एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर जाऊन पोहोचले. डावीकडची खोली. भिंतींचा रंग उडालेला. प्लास्टर जागोजागी निखळलेलं. ह्या खोलीला दोन औरस चौरस खिडक्या. एक जिन्यासमोर. दुसरी एक पश्चिमेला. ह्या खिडकीशी पाण्याचा माठ. दोन काचेचे पेले. खिडकीशी एक खुर्ची. लाकडी. खुर्चीला लटकलेली टम्म फुगलेली शबनम पिशवी. खुर्चीसमोर बऱ्यापैकी मोठं टेबल. टेबलावर वर्तमानपत्रं, मासिकं, पत्र, हस्तलिखितं, पुस्तकं. टेबलाभोवती मांडलेल्या चार खुर्च्या. घडीच्या खुर्च्यांवर साहित्यातली मातब्बर मंडळी. त्यात चि.त्र्यं. खानोलकर, ज्ञानेश्वर नाडकर्णी असावेत. मी साहित्यिकांना ओळखीत नव्हते. ह्या दोघांना कसं ओळखलं कोण जाणे!

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

This Post Has 2 Comments

  1. Khoop awadala lekh. Thanks for sharing.

  2. फारच छान .
    त्यावरून निर्मला देशपांडे यांच्या “टिकलीएवढे तळे “या सुंदर पुस्तकाची आठवण झाली .

अभिप्राय द्यायला विसरू नका...

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Close Menu
%d bloggers like this: