एक आठवडा : हार्वर्डचा

हार्वर्ड विद्यापीठाच्या साऊथ एशिया इनिशिएटिव्ह या प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील काही विद्यापीठांचे कुलगुरू, प्रशासकीय अधिकारी, मंत्रालयातील अधिकारी यांची टीम बोस्टनला जाऊन आली. साडेतीनशे वर्षांची दीर्घ परंपरा असलेल्या अन् उच्च शिक्षणक्षेत्रात मानाचे पान पटकावणाऱ्या हार्वर्ड कँपसमधून आपल्याला काही घेता, शिकता येण्यासारखे आहे काय या उद्देशाने राज्य सरकारने या दौऱ्याची आखणी केली होती. पाचसात किलोमीटर्सच्या अंतरावर असलेली दोन विद्यापीठे – हार्वर्ड अन् एम.आय.टी. – बोस्टनची खास वैशिष्ट्ये! कुठे किती नोबेल पुरस्कारविजेते इथपासून या दोन विद्यापीठांत स्पर्धा. ही स्पर्धाही इतक्या वेगळ्या स्तरावरची, की हार्वर्डच्या संयोजकांनी आम्हाला संपूर्ण हार्वर्ड कँपस दाखवले, पण एम.आय.टी.ची ट्रीप आयोजित करण्यास चक्क नकार दिला! याला म्हणतात स्वाभिमान (की दुराभिमान?)

हार्वर्डची परंपरा साडेतीन शतकांची असली तरी या विद्यापीठाची खरी प्रगती गेल्या तीनचार दशकांतलीच आहे. म्हणजे पैशाची, जागेची चणचण वगैरे प्रश्न जसे आपल्याकडे असतात तसे त्यांनाही होतेच. संपूर्णत: देणग्यांवर विसंबून असलेले हे विद्यापीठ आहे. पालक, माजी विद्यार्थी, दानशूर, शिवाय मोठमोठ्या कंपन्या यांच्या देणग्यांवर हा डोलारा उभारलेला… शिवाय विद्यार्थ्यांना शिक्षणशुल्कदेखील भरपूर द्यावे लागते. कोणत्याही अभ्यासक्रमाचा खर्च वर्षाला पन्नास हजार डॉलर्सपेक्षा कमी नाही! निवडक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या मिळतात. पण त्या स्पॉन्सर प्रोजेक्टस्मधून… म्हणजे प्राध्यापकांना मिळणाऱ्या संशोधनप्रकल्पांतून त्या दिल्या जातात. हार्वर्डचे वैशिष्ट्य हे, की विद्यार्थ्यांचा प्रवेश म्हणा की प्राध्यापकांची नियुक्ती, कुठेही गुणवत्तेच्या बाबतीत मुळीच तडजोड नसते. अगदी भरपूर देणगी देणाऱ्याच्या नातेवाईकालादेखील प्रवेश नाकारला जातो,

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

This Post Has 11 Comments

 1. लेख आवडला.
  खान अॅकॅडमीचा अतिशय चांगला अनुभव आम्ही नुकताच मुलाच्या बारावीनिमित्ताने घेतला. त्यानेच या यु ट्यूब लेक्चर्सबद्दल ऐकून त्यावरून शिकायला सुरूवात केली. त्याला त्या लेक्चर्सचा फायदाही झाला.

 2. Thats why our iitian rush to foreign universities

 3. हि माहिती अत्यंत सुंदर आहे . पण आपले शिक्षण खाते केव्हा लक्ष देईल ते पाहू

 4. खूपच छान

 5. vichar karayala lagto. mastch

 6. Anubhavkathanacha utkrushta namuna.ANUBHAVKATHAN lihinyachiprerna milali.

 7. mast

 8. फारच सुंदर लेख…

 9. Good

 10. very nice…

  1. superb

अभिप्राय द्यायला विसरू नका...

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Close Menu
%d bloggers like this: