मंत्रिपदाचा ‘शबे आखिर’

केसरी दिवाळी अंक – ऑक्टोबर १९६२

काकासाहेब गाडगीळ

“साहेब आता मोटार चांगली दिसत नाही.” चंदनसिंग बोलता झाला. त्याने पांच मिनिटांपूर्वीच मंत्रिपदनिदर्शक झेंडा व अशोकचक्र मोटारीपासून काढून घेऊन केबिनेट सेक्रेटरीएटकडे धाडले होते. ता. १२ मे १९५२ चा दिवस होता. त्या दिवशी जुने मंत्रिमंडळ समाप्त झाले. नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी ९ वाजतां व्हावयाचा होता. मंत्रिमंडळांत न घेतल्याने ही सत्तेची कवचकुंडले काढून परत केली होती; आणि या मागे केवढा इतिहास होता! काही नाटककार आनंदपर्यवसायी नाट्यकृतीत चमकतात तर काही शोकांतिकांच्या रचनेत नाट्यकलाकृतीचा उत्कर्ष गाठतात. तसेच थोडे अधिकारग्रहण व त्याग या प्रसंगांतून जातांना अनेक व्यक्तींच्या जीवनात घडून येते. स्थितप्रज्ञ मी नव्हतो. सुखदुःख यांना समान मानले होते असेही नाही. ‘लाभालाभो’ यांना नेहमीच सारखे लेखले असेही नाही; पण खरे सांगावयाचे म्हणजे अधिकारमुक्तीमुळे एक प्रकारची अननुभवलेली शांतता व समाधान लाभले होते. क्षणभर दीर्घ कारागृहवासानंतर मुक्तिदिनी मुक्त झालेल्या मनुष्याला जसे वाटते तसे थोडे वाटत होते. ४ वर्षे ९ महिने ज्या अवस्थेतून गेलो होतो त्यांत बदल झाला होता; आणि या दीर्घ काळांत मनावर पडलेला ताण कमी झाल्याने मन उल्हासित झाले होते. तथापी त्या उल्हासांत उदासीनतेची छटा होती, हे सत्य सांगितले पाहिजे. किंबहुना निराशा अगर नाराजी ही दोन्ही नसली तरी काही अधिक करून दाखविण्याची संधी येथून पुढे नाही ही खेदाची आर्त लकेर त्या ठिकाणी होती हे खरे.

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

This Post Has 2 Comments

  1. काकासाहेबांनी लिहलेल्या राजकीय आत्मकथनात बहुदा त्याचे नाव ‘लाल किल्ल्याच्या सावलीत’,असे असावे.आता नेमके आठवत नाही. ते मी वाचले आहे.त्यात या आठवणी आहेत.त्यांच्याकडे राज्यपालपदाचा प्रस्ताव घेऊन आलेल्या व्यक्तीचेही नाव असावे….काकासाहेब खूप मोठी व्यक्ती.. सीडी,काकासाहेब,नाथ पै,आंबेडकर,मधू लिमये,यशवंतराव ही लोकमान्यांनंतर राष्ट्रीय राजकारणात चमकलेली मोठीच माणसं…!!

  2. ऐतिहासिक माहिती व घटना यांची सजगतेने घेतलेली नोंद या शब्दात या १९६२ च्या लेखकाविषयी म्हणतां येईल. मला हा लेख पुन्हा सविस्तर असा वाटायला हवा. धन्यवाद.

अभिप्राय द्यायला विसरू नका...

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Close Menu
%d bloggers like this: