आजच्या ग्रामीण जीवनाचे वास्तव चित्रण- बारोमास

‘‘शेतकरी कुटुंबात जन्मलो, मातीत राबलो म्हणूनच मातीतल्या माणसांची सुखदु:खे मांडू शकलो. या काळ्या मातीनेच मला लेखक बनवले व गौरवले. शेतकर्‍यांच्या जीवनाला ‘बारोमास’ वेढून असणार्‍या, जन्मजात वेदनेच्या हुंकारातून जन्माला आलेल्या या कादंबरीचे प्रेरणास्थान माझ्या सभोवतीचा ओलासुका ग्रामीण परिसर हाच आहे. लेखकाने आपल्या निष्ठा आणि अनुभव यांच्याशी प्रामाणिक राहून लेखन करावे या माझ्यावरील वाङ्मयीन संस्कारांचे फलित म्हणजे ‘बारोमास’ ही कादंबरी आहे.’’ लेखक सदानंद देशमुख यांचे हे विचार ‘बारोमास’ वाचताना अगदी यथार्थ वाटतात.

‘लचांड’, ‘उठावण’, ‘महालूट’ यांसारखे कथासंग्रह व ‘महान’ ही कादंबरी लिहिणारे सदानंद देशमुख, बुलढाणा जिल्ह्यातील, मेहेकर तालुक्यातील, जानेफळ येथील महाविद्यालयात अध्यापक आहेत. मराठीत एम.ए. केल्यानंतर त्यांनी सुमारे 1978च्या सुमारास लेखनाला प्रारंभ केला. धगधगते ग्रामीण जीवन वाचकांसमोर उभे करणारे ते नव्या दमाचे कादंबरीकार आहेत.

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

This Post Has 2 Comments

  1. बारोमास बद्दल खूप ऐकलं होत फार पोटतिडिकेन लिहल आहे आवडल

  2. dhanyawad punaha ekada sadar pustak vachlyasarkhe vatale.

अभिप्राय द्यायला विसरू नका...

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Close Menu
%d bloggers like this: