गेली काही वर्षे महाराष्ट्रात धरण-कालवे अशा रुळलेल्या सिंचन वाटा सोडूनही अनेक प्रयोग उपक्रम होत आहेत. त्या त्या उपक्रमातून गाव पातळीवरील/ शेत पातळीवरील पाण्याची गरज निश्चित करणे व त्यानुसार जलसंधारणाच्या कामाची आखणी व कार्यवाही करणे असे काम गेली काही वर्षे सुरु आहे. कोकण व सह्याद्रीला लागून असलेला प्रदेशाच्या तुलनेत अत्यल्प पर्जन्यमान असणाऱ्या प्रदेशात ह्या प्रयोगांमुळे पाण्याच्या विषयातील अनिश्चितता दूर होण्यास मदत झाली आहे. तर काही ठिकाणी नीट योजना केल्यामुळे व अश्या प्रयोगामुळे खात्रीशीर सिंचन झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या कडे समृद्धीची पावले दिसू लागली आहेत.
असेच एक दुष्काळी गाव होते गाढे-जळगाव, तालुका-जिल्हा औरंगाबाद. २०१२ च्या दुष्काळात पावसाची अवकृपा झाली. कोरडा दुष्काळ पडला. शिवारं उघडी पडली. कोणी दावणीची जनावरं विकली, ज्यांना शक्य झालं त्यांनी नातेवाईकांकडे पाठवली. कसबसे दिवस काढले. त्याच गावातील एक शेतकरी हरी ठोंबरे.
kiranjoshi
19 May 2018फारच छान माहिती!
vasant deshpande
18 May 2018मीही शेतकरी नाही. पण राज्यातील, देशातील महत्त्वाच्या बातम्या वाचायच्या, विशेष लक्ष वेधून घेणा-या बातम्यांसंबंधी अधिक काही मिळाले तर वाचत राहायचे, असा माझा शिरस्ता. त्यानुसार गेली काही वर्षे शेतक-यांच्या आत्महत्यांनी अस्वस्थ होऊन त्यावर काही सकारात्मक बातम्या मिळतात का ते पाहत असताना मा. मुख्यमंत्र्यांनी कर्जबाजारी शेतक-यांना माफी देण्याऐवजी ”जलयुक्त शिवार” ही कल्पना मांडली. ज्यांनी शेतक-यांच्या नावावर वर्षानुवर्षे लूट केली त्यांनी कोलाहल केला. पण राजेंद्रसिंहासारख्या विधायक कार्यकर्त्याने सकारात्मक पाठिंबा दिला. त्यामुळे आशा निर्माण झाली. पण त्यांच्या कल्पनेतील गावक-यांच्या सहकारातून गावतळी उभी होताना दिसत नव्हती. उलट कंत्राटदारांनी ते काम ताब्यात घेतल्याचे दिसू लागले. त्यामुळे नाराज होऊन राजेंद्रजींनी दूर राहायचे ठरविले.तेव्हा वाटले, झाले, पुन्हा जुन्या मार्गांनी ही चांगली कल्पना मागे पडणार.
पण त्याचवेळी नाना पाटेकर आणि मकरंद अनास्पुरे यांनी ठिकठिकाणच्या शेतक-यांना धीर देण्यासाठी पुढाकार घेतला आणि सत्यजित भटकळ आणि आमीरखान यांनी गावक-यांना प्रोत्साहित करण्याचा कार्यक्रम हाती घेतला. त्याला गावक-्यांनी चांगला प्रतिसाद दिला. दूरचित्रवाहिन्यांवर त्याची फिल्मी जाहिरातही होत राहिली आणि प्रसिद्ध नट कुलकर्णींचे लेखही वृत्तपत्रात येऊ लागले. त्यातून काही तरी चांगले निश्चित घडते आहे हा दिलासा मिळाला. आज हा लेख वाचल्यावर आणखी छान वाटले.
मला वाटते माझ्यासारख्या दुरून सहानभूतीने पाहणा-यांनी जे चांगले आहे त्याचे सार्वत्रिक कौतुक केले पाहिजे. सक्षद्ध शेतक-यांना ”जे मेहनत करतात त्यांना देव मदत करतो”, याचा अनुभव यंदाच्या पावसाबद्दलच्या बातम्या ख-या ठरल्या तर (अलिकडे तांत्रिक प्रगतीमुळे त्या ख-या ठरतात) येईल आणि राज्यात कृषिक्रांती होईल अशी आशा वाटते.
अनिता ठाकूर.
17 May 2018काहीतरी चांगलं समजलं. समाधान वाटलं. माझा जन्म मुंबईतला. शेतीतले काही कळत नाही. तर, शेततळे म्हणजे नक्की काय ? त्याचा एवढा उपयोग कसा होतो ?