दुसऱ्या महायुद्धाने काय शिकविले?

दुसरे जागतिक महायुध्द सुरु झाले होते त्याला आता आठ दशके होत आली आहेत. जागतिक राजकारणावर त्याची छाया अजूनही आहे आणि युरोपातील सिनेमा,साहित्य व इतर कलांमध्ये अजूनही त्याचे पडसाद उमटत असतात. जगातील ३० देशांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे या युध्दाशी संबंध आला, त्यात भारताचा संबंधही तसा थेट नव्हता. परंतु भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्या युद्धजन्य परिस्थितीचा हात होता हे आता सर्वमान्य आहे. या युध्दाविषयी लिहिता, बोलताना जर्मनी आणि हिटलर हे जागतिक खलनायक ठरवूनच लिहिले जाते आणि स्वीकारलेही जाते. परंतु याबाबत काही दबलेले तरीही वेगळे सूरसुध्दा सातत्याने उमटत आले आहेत. १९६४ साली म्हणजे महायुध्दाला २५ वर्षे झाली तेव्हा लिहिलेला हा लेख असाच काहीसा सूर जरा आवेगानेच लावणार होता…त्याच्या या वेगळेपणामुळेच तो आज देत आहोत-

********

दुसरे महायुद्ध सुरू झाल्याला पंचवीस वर्ष झाली. त्या युद्धामुळे अनेक वाद उद्‌भवले. विचारवंतांनी बाजू घेऊन भांडणे केली. अजून हे वाद मिटले असे म्हणता यावयाचे नाही. दुसऱ्या महायुद्धासंबंधीचे पुष्कळसे गैरसमज अद्याप रूढ आहेत. सत्य बाहेर येण्यास आतासा कोठे प्रारंभ झाला आहे. याचे एक छोटेसे उदाहरण देण्यासारखे आहे.

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

This Post Has 11 Comments

 1. आज हा लेख परत वाचला,दुसऱ्या महायुद्धानंतर त्याच्या परिणामांकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहनेस हा लेख भाग पाडतो.भारताला स्वातंत्र्य मिळण्यामागे बऱ्याच गोष्टी कारणीभूत झाल्या,त्यापैकी दुसरे महायुद्ध ही एक,कारण आझाद हिंद सेनेच कार्य,बंगाल मधील दुष्काळ व नाविकांचे बंड हीही तातकलीक कारणे होतीच.त्याचप्रमाणे हिटलरने ज्यू लोकांची केलेली कत्तल ही कोणत्याही angle ने समर्थनिय नसलीतरी एखाद्या समाजाविरुद्ध इतका असंतोष का निर्माण झाला ,ज्यू समाजाचे काहीच चुकत नव्हते का? कारण आज इस्रयल काय करतोय हे आपण पाहतोयच.
  आणि हो ज्यू लोकांचा छळ केवळ जर्मनी मधेच झाला का? प्रश्न बरेच आहेत,असो या लेखामुळे परत एकदा विचार करावालागतोय

 2. I am your member

 3. Could not open the article

 4. एक खुप वेगळा कधीही विचार केला नव्हता असा दृष्टिकोन…. खुप छान लेख.

 5. खूप छान लेख! परंतु आता 1965,71 सारखे युद्धाकडे बघत नाही. त्यामुळे लेखातल्या काही विधानांचे महत्त्व धूसर होते. बायदवे, लेखक ज्यूंच्या कत्तलींबाबत सौम्य कसे? “स्टॅलिनने पहा किती मारले”,” माओ ने पहा किती मारले” हा बचाव होऊ शकत नाही!

 6. APRATIM

 7. लेख खरोखरच अप्रतिम आहे, आज 2018 साली मागे वळुन पाहताना आपण देश म्हणून काय शिकलो ह्याच विचार मनात येतो,

 8. लेख अप्रतिम आहे.. शेवटचा परिच्छेद तर फारच छान ..
  इतिहास जेते लिहितात हे सत्य आहे.. आजही Hollywood मधील चित्रपटात, जर्मन सैनिक व अधिकारी बावळट दाखविले जातात.. असो..

  दुसऱ्या मह्युद्धाचे इतरही अनेक परिणाम झाले..

  भारताच्या संदर्भात या लेखातील “आपल्याला स्वातंत्र्य मिळाले ते केवळ दुसऱ्या महायुद्धामुळे मिळाले ….” हे वाक्य दुस-या महायुद्धाच्या परिणामांबाबतचे अचूक विश्लेषण आहे.. केवळ भारतच नाही तर ब्रिटीशांच्या अनेक वसाहतींना स्वातंत्र्य मिळाले.. दुसऱ्या महायुद्धाने ब्रिटीश पार पिचून गेले.. वसाहतींचा डोलारा सांभाळण्यासाठी आवश्यक मनुष्यबळाची व अर्थबळाची कमतरता, व स्वत:च्या उध्वस्त देशाची पुनर्उभारणी करण्याचे आव्हान, यामुळे त्यांच्यापुढे पर्यायच उरला नाही.. मराठी व हिंदीतील बालबुद्धी गीते काहीही म्हणोत, भारताला स्वातंत्र्य मिळाल्याचे श्रेय या अर्थाने हिटलरला जाते.
  होलोकास्ट हा भयंकर व अमानवी प्रकार होता हे १०० टक्के सत्य आहे.. त्यात ६० लाख ज्यू मारले गेले. हिटलरचे समर्थन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही…
  पण क्रूरकर्मा स्टालिनने किती माणसे मारली याची गणतीच नाही.. स्टालिनच्या कार्यकाळात अंदाजे दोन ते तीन कोटी माणसे मेली.. (https://en.wikipedia.org/wiki/Number_of_deaths_in_the_Soviet_Union_under_Joseph_Stalin)
  चीन मध्ये माओच्या “Great Leap Forward” च्या काळात साडेचार कोटी माणसे फक्त चार वर्षात मेली…
  (https://www.independent.co.uk/arts-entertainment/books/news/maos-great-leap-forward-killed-45-million-in-four-years-2081630.html)
  पण अमेरीकेतील ज्यू लॉबीच्या प्रभावामुळे, फक्त हिटलर हा एकमेव क्रूरकर्मा होता असा सार्वत्रिक समज झाला..
  दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका एकमेव महासत्ता बनली.. (कारण अमेरिकेला युद्धाची थेट झळ पोहोचली नाही) त्यामुळे अमेरिका म्हणजेच विश्व असा त्यांचा समज झाला, तो आजही कायम आहे.. नंतर एक विश्व अमेरिका दुसरे विश्व रशिया आणि बाकीचे third world countries अशी जगाची विभागणी झाली.
  यावर खूप काही लिहिता येईल.. तूर्तास एवढेच…

 9. साठ लाख ज्यूंना मोक्ष मिळवून देण्याचं लहानसं पातक हिटलरच्या हातून घडलं. पण ते एवढं विशेष नाही.

 10. आजच्या परिस्थितीचा विचार करता लेखात व्यक्त केलेले विचार “समकालीन” वाटतात.

अभिप्राय द्यायला विसरू नका...

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Close Menu
%d bloggers like this: