दत्तो वामन पोतदार हे मराठीतले स्पष्टवक्ते संशोधक आणि भाष्यकार तर ‘चित्रमयजगत्’ हे पुरोगामी विचार धाडसाने मांडणारे मासिक. राजवाड्यांच्या ‘विवाहसंस्थेचा इतिहास’ मधील एक प्रकरण प्रसिद्ध केल्याबद्दल ‘चित्रमयजगत्’चे अंक जाळण्यापर्यंत त्याकाळी काहींची मजल गेली होती. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठीची चळवळ सुरु असताना म्हणजे १९५७ साली ‘चित्रमयजगत्’ मध्ये पोतदारांनी लिहिलेला लेख आज देत आहोत. संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्याला आता सहा दशके होत आली तरीही विदर्भ,मराठवाडा,कोकण आणि उर्वरित महाराष्ट्र यांचा समतोल विकास साध्य झालेला नाही आणि सर्वच राजकीय पक्ष या विषयाचे केवळ राजकारण करत असतात.संयुक्त महाराष्ट्रात समाविष्ट होऊ घातलेला सर्वच प्रदेश मराठी भाषेने कसा एकत्र जोडलेला आहे आणि या प्रदेशातील लोकांची मानसिक,वैचारिक जडण-घडणही किती मिळती जुळती आहे याचे अतिशय मार्मिक असे विवेचन दत्तो वामन यांनी या लेखात केलेले आहे. एवढेच नव्हे तर या वैचारिक वर्तुळात गोव्याचाही समावेश होतो याचा उल्लेख करायलाही ते विसरले नाहीत. आज असमतोल विकासाच्या भेगा रुंदावत असताना अवघ्या महाराष्ट्राला एकत्र बांधणारा हा धागा पुन्हा एकदा सांगण्याची गरज निर्माण झालेली आहे, हे हा लेख वाचताना लक्षात येईल-
upd
24 Sep 2018लेख अत्यंत सुंदर. परखड . वास्तवाचे निर्भीड वर्णन करावे ते , दत्तो वामन पोतदारांनीच.
ते स्वतः अत्यंत विद्वान, विषयाशी प्रमाणिक, सखोल अभ्यासक, आणि चिकित्सकही होते.
त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचा योग बरेच वेळा आला. त्या काळचे एक ज्येष्ठ व श्रेष्ठ असे हे व्यक्तिमत्व.
धोतर-काळा कोट -मफलर आणि डोक्यावर पगडी असे त्यांचे भारदस्त व्यक्तित्व.
इतिहासाचा, परंपरेचा, संस्कृतीचा , संस्कृतचा , आणि मायबोली मराठीचा जाज्वल्य अभिमान असलेल्या काही थोर व्यक्तींतील अग्रणी असलेल्या, महा महोपाध्याय दत्तो वामन पोतदारांस आदरपूर्वक अभिवादन
–ऊर्मिला देवधर
Vasant
4 Aug 2018सुंदर
asmitaph
3 Aug 2018So informative !
Anil95
31 Jul 2018वाचनीय.
TINGDU
26 Jul 2018विषय मला समजायला किचकट आहे.
prithvithakur1
25 Jul 2018खूपच छान लेख. पोतदारांचे आणखी लेख द्यावेत. माणूस ,सोबत, सत्यकथा,मौज, हंस व किर्लोस्कर मधील जुने चांगले लेखही द्यावेत.
drvyankatesh
25 Jul 2018इतका जुना लेख छापल्याबद्दल धन्यवाद ग वा बाहेर संपादक असतानाचा सा सोबतचे काही लेख ऊपलब्ध असल्यास छापावे धन्यवाद
sugandhadeodhar
25 Jul 20181957आणि2017परिस्थितीत फारसा फरक पडला आहे अस वाटत नाही