‘सॅग हाये वेलगार्द’ अर्थात भटकी कुत्री

इटालियन न्यू वेव्ह सिनेमानंतर जागतिक सिनेमात दखल घ्यावी असा क्रांतिकारी बदल घडून आल्याचे दिसले ते इराणी सिनेमात. 1979 साली  झालेल्या इराणी क्रांतीनंतर कलावंत, दिग्दर्शक,लेखक यांच्यावर अनेक बंधने घातली गेली. या मुस्कटदाबीतून उलट इराणी सिनेमा झळाळून उठला. माजिद माजिदी, मोहसिन मखमलबाफ, अब्बास किरोस्तामी, जााफर पनाही असे अनेक श्रेष्ठ आणि बरेच नवे दिग्दर्शक उदयाला आले. त्यानंतर आलेल्या नव्या दिग्दर्शकांत तरूणींची संख्या मोठी आहे हे विशेष.  हेमंत  जोगळेकर यांच्या प्रस्तुत लेखातही मर्झी मेस्किनी  या दिग्दर्शिकेच्या ‘साग-हये वेलगार्द’ (स्ट्रे डॉग) या चित्रपटाचे मनोवेधक रसग्रहण आहे. अफगाणिस्तानातील सामाजिक, राजकीय स्थितीचा कुटुंबांवर झालेला परिणाम या कथेतून सांगितलेला आहे. लहान मुलांच्या व्यक्तिरेखा आणि त्यांचा सहज सुंदर अभिनय हा अलिकडल्या इराणी चित्रपटांचा विशेष यातही दिसून येतो.  लेख वाचून झाल्यावर हा चित्रपट पाहण्याची इच्छा नक्कीच होईल. यू ट्यूबवर Sag-haye velgard  असे टाइप केले की हा पूर्ण चित्रपट पहायला मिळेल. योगायोगाने श्रेष्ठ जपानी दिग्दर्शक अकिरा कुरोसवा यांचाही  stray Dog या नावाचा एक चित्रपट आहे आणि तोही अप्रतिम आहे. जिज्ञासूंनी तोही अवश्य पहावा-

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

This Post Has 8 Comments

  1. I have always enjoyed Irani films. Will see this as well on you tube

  2. वा, खूपच छान चित्रपट परीक्षण आहे. अशी आणखी उत्तमोत्तम परीक्षणे वाचावयास आम्हाला आवडतील.

  3. चित्रपट परीक्षण वाचून हा चित्रपट पाहण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली आहे. अशा प्रकारच्या आणखी लेखांची अपेक्षा आहे….👍

  4. अशी आणखी परीक्षणे वाचायला आवडतील!

  5. कथानक आवडले. चित्रपटाच्या दिग्दर्शकीचे कौतुक ही वाटले.

  6. असे चित्रपट परिक्षण वाचणे हा देखील एक छान अनुभव आहे

  7. एका वेगळ्या चित्रपटाची ओळख. असे सिनेमे कधी आणि कुठे दाखवले जातात

  8. सरस!

अभिप्राय द्यायला विसरू नका...

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Close Menu
%d bloggers like this: