काळकर्ते परांजपेः काही रंगतदार आठवणी

शि.म. परांजपे यांच्या नावाच्या आधी ‘काळ’कर्ते हे शब्द जोडायची आणि वाचायची आपल्याला एवढी सवय होऊन गेलेली आहे की ते शब्द म्हणजे जणू त्यांच्या नावाचाच एक भाग आहे असे आपल्याला वाटते. परंतु त्यांचे कर्तृत्व आणि लेखनकर्तृत्वही चौफेर होते. गंभीर लिखाण करणाऱ्यांच्या लेखनात अनेकदा रसाळ शैली, ओघात येणारे विनोद यांचा अभाव असतो. शि.म. त्याला अपवाद होते. लिहिताना, बोलताना ते खूप गंमती जमती करत. ‘विष्णुसहस्रनाम’ या शीर्षकाच्या त्यांच्या एका लेखात त्यांनी सत्तावीस ओळींचं आणि दोनशेतीस शब्दांचं प्रदीर्घ वाक्य  लिहिलं होतं. १९२९ साली बेळगावमध्ये भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षही होते. टिळकांचे अनुयायी असलेले परांजपे टिळकांच्या मृत्यूंनतर गांधीवादाकडे वळले परंतु तिथे ते रमू शकले नाही. त्यांच्या लिखाणाएवढाच त्यांचा स्वभाव आणि वागणेही वैशिष्ट्पूर्ण होते. त्यांच्या स्वभावविशेषांचा हा रसाळ आलेख चितारला आहे सौ. निर्मला विजय गोखले यांनी. लेखिका बहुधा परांजपे यांच्या सासरकडून जवळच्या नातेवाईक असाव्यात. हा मूळ लेख सह्याद्री या साप्ताहिकात १९६८ साली प्रसिध्द झाला होता.

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

This Post Has 16 Comments

 1. अत्यंत दुर्मिल लेख,धन्यवाद

 2. माहितीपूर्ण लेख.
  शिवरामपंतांचे वक्रोक्तीपूर्ण लेख मराठीचा विद्यार्थी म्हणून अभ्यासाला होते. ती भाषा लगेच कळत नसे.पण कळली की इंग्रज सरकारचे कसे वाभाडे काढले हे लक्षात येई.
  धन्यवाद !

 3. मी पूर्वाश्रमीची ऊर्मिला वामन परांजपे.
  आपण सर्वांनी वरील लेखात जी, त्यांना नातू झालेली कथा वाचलीत , तो अण्णांंचा नातू म्हणजे माझे वडील वामन कृष्ण परांजपे.
  माझ्या वडीलांची वाड़्मय-सेवेेेची सुरवात त्यांच्या आजोबांच्या,
  ती. अण्णांंच्या चरित्र-लेखनाने झाली. ‘मेघदूतावर नवा प्रकाश’ ह्या मेघदूवरील संशोधन पुस्तकात त्यांनी आवर्जून ती. अण्णांंसाठी ‘ऋणनिर्देश ‘ केला आहे.
  वडिलांच्या आठवणींतून आम्ही ती. अण्णा अनुभवले. अशा थोरांच्या प्रकाश वलयात आमचे बाल्य उजळले याचा सार्थ अभिमान आहे. महद् भाग्य म्हणून ह्या वंशात जन्मलो, वाढलो आणि जे परंपरेने लाभले ते खरोखरीच आहे शब्दातीत.
  ऊर्मिला प्रमोद देवधर

 4. धन्यवाद ह्या दुर्मिळ लेखाबद्दल . फारच सुंदर आहे हा .

 5. Uttam. Gharachya vaktichya aathvani eklysarkhe vatle. Chhan vatle. Aanan zala. Samadhan pawalo. Lekhabhaddal dhnyawad aani likhanasathi shubhechhya.

 6. फारच सूंदर.

 7. I am from Goregaon.However this information is new to me.Thank u verymuch and request u to make available such type of articles

 8. असे दुर्मिळ लेख वाचायला मिळतात. धन्यवाद. लेख छान आहे.

 9. असे दुर्मिळ लेख वाचायला मिळतात. धन्यवाद. लेख छान आहे.

 10. ‘काळ’कर्ते परांजपे यांच्याविषयीच्या या आठवणी पुष्कळ नवीन माहिती देणा-या आहेत. हा असा लेख हुडकून आणून आम्हा वाचकांना दिल्याबद्दल आभार.
  मंगेश नाबर

अभिप्राय द्यायला विसरू नका...

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Close Menu
%d bloggers like this: