वजनकाट्याचे गुलाम

लेखक: डॉ. राजीव शारंगपाणी 

असमाधान हा सध्याच्या संस्कृतीचा आत्मा आहे. हे असमाधान आपल्या शरीरापासून ते आपला नवरा, बायको, मुले, काम, मिळणारे पैसे, घर, वाहन ह्या सर्व गोष्टींत परमेश्र्वरावर ताण करून सर्वव्यापी झालेले आहे. ‘ठेविलें अनंते तैसेंचि राहावें, चित्तीं असो ध्यावें समाधान’ म्हणणारे तुकोबा म्हणजे अडाणीच वाटतील, अशी परिस्थिती आहे. एकदा ‘चित्तीं असो द्यावे असमाधान’ अशी परिस्थिती उत्पन्न झाली, की मग ते मायावी समाधान मिळवण्यासाठी मनुष्ये पैसे खर्च करू लागतात. समाधान हे पैशाने कधीच मिळत नसल्याने पैसे खर्च करतच बसतात. क्षितिजासारखे समाधान सारखे लांबच पळत असते.

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

This Post Has 10 Comments

 1. आपल्या प्रकृती नुसार आहारविहार असावा असे आयुर्वेदात ही सांगितले आहे. सरांनी सोप्या पद्धतीने विषय मांडला. छान.

 2. एवढा बहुचर्चित चोथा झालेला विषय येथे मलातरी अपेक्षित नव्हता

 3. खूपच छानं ! अर्थपूर्ण !

 4. लेख चांगला आहे पण रात्री जेवू नये ह्याचा खुलासा व्हायला हवा की एकदाच जेवावे का रात्री उशिरा जेवू नये.

 5. डॉ. शारंगपाणी सर हे अतिशय परखड लेखनासाठी प्रसिद्ध आहेत. योग्य लेख

 6. लेख नेहमीप्रमाणेच खुसखुशीत व नर्मविनोदी.
  या लेखकाची सर्वच पुस्तके अशीच छान आहेत .
  धन्यवाद

 7. chhan

 8. डॉक्टर महाशयांनी हा लेख लिहिला सप्टेंबर २०१०!
  पण त्यावर विचार किती जणानी केला? ठेविले अनंते …. सारखी वचने वाचण्यासाठी नसून पाळण्यासाठी असतात, हे तर आम्ही केव्हांच विसरलो आहोत.
  पण आज १५ ऑक्टोबर २०१८ रोजी सुद्धा वजनदार किंवा वजनरहित होण्यासाठी शॉर्टकट शोधण्याचा हव्यास काही सुटत नाही. साध्या व्यायामाने, योगासनांनी आणि मुख्यत: ‘रसने’वर ताबा ठेऊन जे काम होऊ शकते ते औषधांच्या साह्याने करणे म्हणजे आपणच आपल्या देहावर अत्याचार करण्यासारखे आहे. डॉक्टरांनी महत्वाचा मुद्दा मांडलाय, तो आहे व्यक्तिमत्वाचा! सिक्सपॅक्स किंवा स्लिमट्रिमच्या नादात स्वत:चे व्यक्तिमत्व कसे उठावदार होऊ शकेल, याचा विचार करायला कोणाकडे वेळही नाही, ही खरी शोकांतिका आहे! युग जाहिरातींचे आहे, पण नकाराधिकारही आपल्या हाती आहेच की, त्या जाहिरातींना न भुलण्याचा!

 9. मार्गदर्शक व उपयुक्त माहिती दिली……

 10. 👌👌👌सर्वांनी आचरण करावे असा लेख!

अभिप्राय द्यायला विसरू नका...

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Close Menu
%d bloggers like this: