भूतलावर स्थिरावलेल्या देवांगना

लेखक – भय्यासाहेब ओंकार

एकदा गंधर्व, अप्सरांनी देवेन्द्राला विनंती केली की, “स्वर्गातल्या अमृतपानाचा आणि स्वर्गातल्या नंदनवनाचा आम्हाला अगदी वीट आला आहे. आम्हाला काही काळ पृथ्वीवर वास्तव्य करण्याची परवानगी द्या. तिथल्या सुखदुःखाचा आम्हाला अनुभव घेऊ द्या.” गंधर्व, अप्सरांच्या विनंतीला मान्यता देणे देवेन्द्राला जड वाटू लागले. त्याला चिंता वाटू लागली की या स्वर्गांगना पृथ्वीवरच्या माणसांच्या नजरेस पडल्या तर पृथ्वीवरची माणसे त्यांच्या चरणी लागतील. पृथ्वीवरचे वातावरण या देवांगनांना रुचले तर त्या तिथेच मुक्काम ठोकतील आणि स्वर्गाचा त्यांना विसर पडेल. पण त्या साऱ्यांच्या हट्टापुढे देवेन्द्राचे काही चालेना. अखेर देवन्द्राने त्यांना सांगितले की, “तुम्हाला मी फक्त एक रात्र पृथ्वीवर रहाण्याची संधी देतो. एका कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री तुम्ही पृथ्वीवरच्या कोणत्याही एका रमणीय वनश्रींत विहार करा. मात्र हे ठिकाण पृथ्वीतलावरील मनुष्यवस्तीपासून दूर असायला हवे आणि दुसऱ्या दिवशी सूर्य उगवायच्या आत तुम्ही परत स्वर्गात हजर व्हायला पाहिजे. या अटी जर तुम्ही पाळल्या नाहीत तर मात्र माझ्या शापाला तुम्हाला बळी पडावे लागेल.”

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

अभिप्राय द्यायला विसरू नका...

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Close Menu
%d bloggers like this: