बारावीत असेन तेव्हा. कॉलेजात असताना अनेक महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी वगैरे चे औचित्य साधून आम्ही कार्यक्रम करायचो. त्या वर्षीचा सहा डिसेंबर. बाबासाहेबांचा महानिर्वाण दिन साजरा करायचं ठरलं. निमंत्रित वक्त्यांचं व्याख्यान आणि त्यानंतर प्रश्नोत्तरे असं नेहमीचं स्वरूप. तीन चार दिवस आधी प्रसिद्धी सुरु केली. फर्ग्युसनच्या मेन बिल्डिंगसमोर तीन चार फलक असलेली एक जागा आहे. त्यावर कार्यक्रमाची माहिती वगैरे लिहिली की कार्यक्रमाला गर्दी जमवायला विशेष कष्ट घ्यावे लागत नसत. महानिर्वाण दिनाच्या दोन दिवस आधी मी रंगीत खडू घेऊन पाटीवर कार्यक्रमाची सूचना लिहीत होतो. तंद्री लागलेली. तेवढ्यात मागून एका सिनियर दिसणाऱ्या मुलाने हटकले.
rakshedevendra
30 Dec 2018लेखक श्री. प्रतिक कोकसे यांस,
उत्तम लेख, आपल्या विचारांची खोली या लेखातून “अभ्यासोनी” प्रकटली.
बाबासाहेब फक्त जातीपुरतेच वंदनीय का, प्रत्येक भारतीयास त्यांच्या विचारांचा स्पर्श सकल देशाला खूप उंचावर नेऊन ठेवेल हे नक्की.
बाबासाहेब आंबेडकर यांचा अभिमान बाळगणारा प्रत्येक माणूस (माणूस या शब्दावर विशेष जोर देतोय) हा सर्वप्रथम एक व्युत्पन्न सव्यसाची साक्षेपी वाचक व्हायला हवा.
बाबासाहेब स्वतःमध्ये जगणे म्हणजे बहुविध पुस्तकांना आतील विचारांसह रिचविणे हे होय.
या लेखातील एका वाक्यात सांगितलेला बाबासाहेबांचा प्रवास त्यांचे अवघे जीवनपट रेखीत गेला असेच भासले.
एका सुंदर वाक्यात संपूर्ण आयुष्याचे श्रेयस जणू एकवटले असेच मला वाटते आहे.
शतकानुशतके अन्याय सहन करीत आलेल्या अशा जणू मेलेल्या मनातील अस्मिता फुंकरून, ती अस्मिता जागृत करून, फुलविण्याचे कार्य हे या जीवनपटातील मध्यांतर नि त्याचेच सुखांती पर्यवसान म्हणजे तीच ती जागृत झालेली अस्मिता विचारांच्या परिपक्व स्थितप्रज्ञते कडे नेत जाणे यास बुद्धास अपेक्षित असे जे सम्यक ज्ञान केवळ पुस्तकं वाचूनच साध्य होऊ शकते हे देखील बाबासाहेबांनीच स्वतःच्या उदाहरणावरून देशाला दाखवून दिले आहे हेच खरे.
सामाजिक अवहेलनेतून बाहेर पडल्यावर जागृत झालेली अस्मिता परिपक्वतेच्या भावनेत विरघळायला हवी असेल तर आता गरज आहे आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्याची. बाबासाहेब थोर अर्थतज्ञ देखील होते, नि आपला समाज उद्योजकता अंगीकारून आर्थिकदृष्ट्या बलवान झालेला पाहणे ही देखील त्यांना कर्तुत्वाने वाहिलेली श्रद्धांजली ठरेल.
वंचितांची वाटचाल उद्योजकते होण्यासाठी काय करता येईल हा पण माझ्या अभ्यासाचा विषय आहे.