बाटग्या ब्राह्मणाला दक्षिणा

शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी काही साहित्यिकांना, गौरव म्हणून मोठ्या रकमा देण्याचे जाहीर केले होते. तेव्हा महाराष्ट्र टाइम्सचे संपादक गोविंद तळवलकर यांनी अग्रलेख लिहून त्यास विरोध केला होता आणि त्या रकमेची संभावना ‘रमणा’ अशी केली होती. पेशवाईच्या काळात लोकप्रिय असलेला हा रमणा म्हणजे नेमका काय प्रकार होता, त्यांची गंमतीशीर हकीकत अ. का. प्रियोळकर यांच्या या लेखात आहे. शिवाय भ्रष्टाचाराला, औद्धत्यालाही जात-धर्म नसतो हेही यातून दिसते.  ब्रिटिशांच्या काळातली एक घटना.  ब्राह्मणांना मिळणारी मदत एकाने ख्रिश्चन धर्म पत्करल्यावर बंद झाली, तेव्हा त्याने ‘ती बंद केली जाऊ नये, कारण ती मदत धर्माला नसून ज्ञानाला आहे’, असा दावा केला होता. ‘मनुष्य दानाला पात्र होतो तो त्याच्या कर्माने. जन्माने किंवा धर्माने नव्हे’. हे सूत्र सगळ्यांनाच मान्य असते. परंतु तरीही  आरक्षण, सवलती, जात, धर्म  आणि भ्रष्टाचार हे मुद्दे आज फेसबुक-युगातही वादांचे, चर्चेचे प्रमुख मुद्दे आहेत. प्रस्तुत लेख वाचून आपल्या लक्षात येईल की युगानुयुगे आपण याच चर्चा करत आलो आहोत आणि करत राहणार आहोत.

अ.का. प्रियोळकर हे मराठीतले नामवंत संशोधक, समीक्षक.  ‘डॉ भाऊ दाजी लाड’, ‘कविवर्य मोरोपंत’, ‘मुसलमानांची मराठी कविता’ आदी आठ ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत. ‘विविधज्ञानविस्तारा’त ते सहसंपादक होते. अरूणोदय बी. ए. या नावाने त्यांनी कविताही लिहिल्या. १९७३ साली त्यांचे निधन झाले.

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

This Post Has One Comment

  1. लेख चांगला आहे. रमण्यासंबंधीची माहिती रंजक वाटली. धन्यवाद!

Close Menu
%d bloggers like this: