घरमालकास मानपत्र

लेखक- पु. ल. देशपांडे

**********

मालक, आपले आणि आमचे, मालक आणि भाडेकरू संबंध प्रस्थापित होऊन किती काळ लोटला हे भाड्याच्या पावत्यांवरून आपल्या सहज लक्षात येईल. वास्तविक हा संबंध कधी घडून येईल असे स्वप्नातही वाटले नव्हते. किंबहुना ज्या दिवशी आपली चाळ उभी राहिली, त्या दिवशी ‘याचि देही याचि डोळा’ आम्ही डोळ्यांपुढे जे दृश्य पाहिले ते पाहून ‘घोडा घोडा म्हणतात तो हाच का?’ ह्या चालीवर चाळ चाळ म्हणतात ती हीच का? असा प्रश्न त्या चाळीप्रमाणेच आमच्यापुढे उभा राहिला. जीवनाला विल्यम शेक्सपिअर नामक इंग्रजी नाटककाराने रंगभूमीची उपमा दिली आहे. आपली आणि आम्हा मंडळींची गाठ हा एक नाट्यप्रसंगच! संघर्ष हा नाट्याचा पाया असतो म्हणतात. पण संघर्षाची कुठलीही ठिणगी पडू न देता अनपेक्षित कलाटणी देऊन कोणत्याही प्रसंगांतून नाट्य निर्माण करण्याचे आपले कसब अजब आहे. आपला सदा प्रसन्न चेहरा. वजनी आणि मापी ऐसपैस देहसौष्ठत्व. मधूनच खांदे उडवण्याची लकब. शिवप्रभूंप्रमाणे गुडघ्यात अंमळ अधू असल्याप्रमाणे चालण्याची ढब. ह्या साऱ्या गोष्टींनी आपल्या ठिकाणी एक आगळेच व्यक्तिमत्त्व आकारून आले आहे. आपणाप्रमाणे आपले वज्रचूडेमंडित कुटुंबही! विस्तारभयामुळे मालकीणबाईसंबंधी लिहीत नाही. परंतु अहिल्यामाता, जिजामाता ह्यांच्याच तोलाचे त्यांचे मोल. आणि आपली अपत्ये! यांच्याबद्दल तर लिहावे तितके थोडेच आहे. मानपत्राच्या प्रारंभी ह्या सर्वांचे भरल्या अंत:करणाने, फुटल्या कोपऱ्यांनी, मोडल्या कंबरांनी आणि मुरगळल्या पायांनी स्मरण करून हे मानपत्र दृष्टीखालून घालावे अशी आपणास नम्र विनंती करतो.

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

This Post Has 5 Comments

  1. वाक्यवाक्यात शाब्दिक कोट्या अप्रतिम..मस्त लेख

  2. लेख आवडला; पण 61 वर्षांपूर्वी हा उपहास विरळ असेल जो आजकाल तंबी दुराई सारख्या लेखांमध्ये नेहमीच असतो म्हणून त्याचे विशेष वाटले नाही. असो. पु. ल. सारख्या थोर लेखकाचा लेख केवळ एवढ्याने झाकोळला जाणार नाही.. लहान तोंडी मोठा घास घेतल्याबद्दल क्षमस्व.

  3. छान !!!

  4. पु लं च्या लेखनामध्ये डावं उजवं करणं अवघड असलं तरी हे मानपत्र निःसंशय माझ्या अत्यंत आवडत्या लेखांपैकी एक आहे. चाळ संस्कृतीमध्ये बालपण गेल्याने हा लेख भिडायला वेळ लागत नाही…आणि चाळ संस्कृती वर इतका नर्म विनोदी लेख निदान माझ्या तरी वाचनात नाही..बहुविध मूळे अनेक वर्षांनी आज पुन्हा वाचताना तितकीच धमाल आली…

  5. फार छान लेख डोळ्यासमोर पात्रे उभी राहातात बेरकी मालक असहाय्य भाडेकरू…….. नाटक पाहतो आहोत असेच वाटते

अभिप्राय द्यायला विसरू नका...

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Close Menu
%d bloggers like this: