विजातीय विवाहांनी समाज सुधारेल का?

विविध जातींमध्ये ‘बेटी व्यवहार’ म्हणजे विवाह झाले, तर जातिभेद नष्ट होतील का? आपल्याला या प्रश्नाचं उत्तर आजही देता येत नाही. परंतु ते तसे होतील असं एकेकाळी अनेकांना वाटत होतं. अण्णासाहेब कर्वे यांनी तर ते बोलूनच दाखवलं होतं. आणि मालतीबाई बेडेकरांनी अतिशय मार्मिकरित्या ते तेव्हा खोडून काढलं होतं. परंतु ते खोडून काढतानाही त्यांनी ‘व्यवहाराच्या रणगाड्याखाली चेंगरला जाऊ लागला की आपोआप नको असलेलेही तत्त्वज्ञान समाज स्वीकारतो!’ असं सांगून ठेवलं होतं. आज आंतरजातीय विवाहाचं प्रमाण सर्वाधिक आहे ते परदेशात नोकरीसाठी गेलेल्या भारतीयांमध्ये आणि त्यात केवळ ‘सोय आणि व्यवहारच’ पाहिले जातात. मालतीबाईंचं म्हणणं अक्षरशः खरं ठरलं आहे. प्रत्यक्ष भारतात मात्र अजूनही स्थिती फार बदललेली नाही. जवळपास सत्तर वर्षांपूर्वी  मालतीबाईंनी लिहिलेला हा लेख त्यामुळेच आजही मननीय आहे-

मालतीबाई बेडेकर तथा विभावरी शिरुरकर या लेखिका आणि समाज चिंतक होत्या. विशेषतः समाजातील, कुटुंबातील स्त्रीच्या स्थानाविषयी त्यांनी सखोल चिंतन व लेखन केले आहे. स्त्रियांच्या हक्कांची सुधारणा(१९३०), हिंदु व्यवहारधर्मशास्त्र (१९३१) हे संशोधनपर लिखाण, कळ्यांचे निःश्वास (१९३३) हा प्रसिद्ध कथासंग्रह, हिंदोळ्यावर (१९३४) ही कांदबरी आणि इतर बरेच लिखाण त्यांनी केले आहे. त्या पूर्वीच्या बाळुताई खरे, विश्राम बेडेकरांशी विवाह केल्यावर मालतीबाई बेडेकर झाल्या. (जन्म १ ऑक्टोबर १९०५, मृत्यू ६मे २००१) 

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

अभिप्राय द्यायला विसरू नका...

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Close Menu
%d bloggers like this: