टोपण नावाने विनोदी किंवा टीकात्मक लिखाण करण्याची मराठीत मोठी परंपरा आहे. आलमगीर या नावाने विविधवृत्त या साप्ताहिकात अशा पद्धतीचे राजकीय सामाजिक लिखाण दीर्घकाळ करून चंद्रकांत बावडेकर यांनी मोठाच लौकीक प्राप्त केला होता. त्यांनी अनेक लेखक घडवले. पुढे विविधवृत्त सोडून त्यांनी आलमगीर नावाचे मासिकही काढले. बावडेकरांमध्ये शालेय वयापासूनच बंडखोर वृत्ती, धडाडी, टोकदार लिखाण करण्याची क्षमता होती. १९ जानेवारी १९७६ रोजी त्यांचे निधन झाल्यावर सह्याद्री या साप्ताहिकात दीर्घलेख लिहून हरिभाऊ हर्षे यांनी बावडेकरांचे लिखाण, स्वभाव, व्यक्तिमत्व आणि आयुष्य यावर उत्तमरित्या भाष्य केले होते-त्यात ते म्हणतात- ‘ आपल्या शंभर शब्दांगणिक एक शब्द या परिमाणांत बोलणारा, लोचनांनी स्मित करणारा आणि खाकी विड्या ओढणारा हा ‘आलमगीर’ रस्त्यांतून वावरतांना अथवा आपल्याशीच एकांतात कधी तरी अब्दुल करीमखांच्या लोकप्रिय ठुमरीची एखादी उत्स्फूर्त गोड लकेर मधूनच वातावरणात सोडून द्यायचा.’ – तोच हा लेख.
deepa_ajay
1 Feb 2019खूपच मस्त, अत्रे आणि बावडेकर ह्यांच्या त जे वाद झाले ते लिखाण वाचायला मिळालं तर बर होईल