उपहारगृह चालविण्याचा बिकट धंदा…

एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस,  तेव्हा हॉटेलमध्ये जेवणे हे उथळपणाचे आणि थिल्लरपणाचे समजले जात होते तेव्हा हॉटेलव्यवसाय करणारांकडे कुठल्या नजरेने पाहिले जात असेल याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. हॉटेलात जेवणाला त्याकाळी शौक म्हटले जायचे आणि लोकांचे हे शौक पुरवणारे अर्थातच तुच्छ समजले जात. या ‘बाहेरख्याली’पणाला आज प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे. शहरांमधून तर शनिवारी-रविवारी रात्री घरी काही रांधायचे नाही असा नियम आहे की काय असे वाटण्याजोगी स्थिती असते. परंतु उपाहरगृहांना हे स्टेटस प्राप्त होण्यास बरीच वर्षे जावी लागली. सुरूवातील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ज्यांनी या व्यवसायासाठी झोकून दिले होते त्यात नरहरी गंगाधर  वीरकर हे गृहस्थ होते. त्यांना पुढे यात यश, सन्मान, मान मरातब सर्वकाही काही मिळत गेले. त्यांची दोन पुस्तकेही प्रसिद्ध झाली. १९५६ साली ‘पुरुषार्थ’ या मासिकात त्यांनी लिहिलेल्या या लेखातून त्यांचा हा संघर्ष त्यांनी फारच उत्तमरित्या सांगितला होता-

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

This Post Has 12 Comments

 1. माझे वडील या उपहारगृहाचे नेहमी कौतुक करायचे.
  या लेखात केवढी मॅनेजमेंटची सूत्रे सांगितली आहेत !
  Once again thankful to your team for presenting such gems.

 2. जुन्या स्मृती जाग्या झाल्या. आम्ही वीरकर आहार भवन मध्ये शाळेत असताना रविवारी कधी तरी जेवायला जात होतो. लेख छान आहे आवडला.आता गिरगांव मध्ये महाराष्ट्रीयन थाळी मला नाही वाटत कुठे मिळत असेल.

 3. छान, किरण भिडे, तुझ्याच बद्दल लिहिलंय अस वाटतंय

 4. माझ्या वडिलांनी आयुष्य भर कोकणात हाॅटेल व्यवसाय केला. माझं आणि माझ्या भावंडांच सगळं बालपण ह्या व्यवसायात जणू करपून गेलं. कशीबशी शिक्षणं पूर्ण झाली. ं. पण ह्या व्यवसायाने आम्हाला दुनियादारी चांगलीच शिकवली.
  वीरकरांनी एका विचाराने हा व्यवसाय फुलवला.
  तसं काही सर्वच हाॅटेल व्यावसायिकांच्या बाबतीत होत नाही. बरेचसे पोटार्थी स्वरूपांतच व्यवसाय करत असतात.
  आजकाल हाॅटेलींग व्यवसायाला वलय प्राप्त झाले आहे. पैसे ही भरपूर मिळतात.
  पण ह्या व्यवसायात कुटूंबियांना प्रचंड दगदग होते.
  विरकरांप्रमाणे quality राखून पण व्यवसायाची गणीतं सांभाळून यशस्वी होता येईल….. पण टिकून राहण्यासाठी मनाची ताकद हवी.

 5. श्री किरण भिडे तुम्ही सुध्दा तुमचा अनुभव लिहा के सांगावे पुढच्या पिढीतील कोणाला स्फूर्ती मिळेल

  1. https://bahuvidh.com/877/ आहेच लिहिलेला. वाचा आणि अभिप्राय कळवा.

 6. जुन्या आठवणी जागृत करणारा अप्रतीम लेख. पूर्वी जेव्हा मराठी नोकरपेशे मंडलींच्या उदरभरणाची आत्यंतिक गरज म्हणून अशा हॉटेलांची नितांत गरज होती . आजच्यासारखी चैन म्हणून हॉटेलात जाणे नसे. ‘वेलणकर यांचे वीरकर उपहार गृह’ हे गिरगावातील ‘कुलकर्णी’ ‘विनय हेल्थ होम’यांच्या सारखेच प्रसिद्ध हॉटेल. अनेक वेळा कारणपरत्वे जाण्याचा योग आला .आपल्या लेखाने पदार्थांच्या चवीही आठवल्या
  खुप छान लेख.धन्यवाद !

 7. फारच छान , भाषा त्या काळा प्रमाणे पण ओघावती आहे .

 8. गिरगावातील वीरकर आहार भवन या उपाहारगृहात मई मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्स’ मध्ये असताना (१९७७-१९८२) अनेकदा जेवायला जात असे. अतिशय स्वच्छ व स्वादिष्ट भोजन मिळत असे. ‘मौज’ व ‘मॅजेस्टिक’ मध्ये येणारे अनेक नामवंत लेखक ‘वीरकर’ मध्ये भेटत. श्री. दा. पानवलकरांशी इथेच अनेकदा गप्पा केल्याचे आठवते.लेख त्यांच्या जेवणाप्रमाणेच रुचकर झाला आहे.

 9. आवडला लेखखूपच

 10. उद्बोधक आणि व्यवसायाचे मर्म सांगणारा.

अभिप्राय द्यायला विसरू नका...

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Close Menu
%d bloggers like this: