शाहीर अमर शेख यांनी आपल्या आयुष्यात अनेक भूमिका बजावल्या. क्लीनर, गिरणी मजूर म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. नंतर कामगार नेते म्हणूनही त्यांनी काम केले. स्वातंत्र्य चळवळ, गोवा मुक्ती आंदोलन व संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी आपले शब्द, सूर अन् आपला पहाडी आवाज यांच्या साहाय्याने महत्त्वाचे योगदान दिले. ग. त्र्यं. माडखोलकर यांनी त्यांचा ‘राष्ट्रीय शाहीर’ या शब्दांत गौरव केला होता. ‘जरी जन्माने मुसलमान मी,अमर शेख भाई | महाराष्ट्र माझे घर ,मराठी माझी आई ‘ असे म्हणणाऱ्या अमर शेख यांचे २९ ऑगस्ट, १९६९ रोजी निधन झाले. त्यानंतर वा. वि. भट यांनी ललित मासिकात लिहिलेला अमर शेखांच्या आयुष्याचा, वाटचालीचा धावता आढावा घेणारा हा लेख-
Udaykarve
10 Feb 2019एका स्फुलिंगाची कहाणी आज वाचावयास मिळाली. बहुविध चा हा उपक्रम मोकळ्या वेळेचे चीज करतोय. धन्यवाद..!!
asiatic
9 Feb 2019फारच छान. विस्मृतीत गेलेल्या शाहीराची आठवण जागवली गेली. अगदी लहानपणी ५८-५९सालात संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या काळात ऐकलेली त्यांची प्रचारगीते