सांजवेळची स्वप्ने

लेखक- भानू काळे

ऑगस्ट २००९च्या पहिल्या आठवड्यात औरंगाबादहून एक पत्र हाती आले. उजव्या कोपऱ्यात पत्रलेखकाचे नाव टाइप केलेले होते – सी.डी. देशमुख. ‘हे’ ‘ते’ नव्हेत याचे भान होतेच, पण तरीही पत्राने लक्ष वेधून घेतले. मे २००९च्या अंतर्नादमधील डॉ. दत्तप्रसाद दाभोळकरांचा ‘प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा… एक मुक्त चिंतन’ हा लेख खूप आवडल्याचे पत्रात सुरुवातीलाच लिहिले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील अनेक साहित्यिकांचे-समाजसेवकांचे-राजकारण्यांचे स्वत:ला आलेले कटू अनुभव विशद केले होते. ते लिहिता लिहिताच स्वत:ची जीवनकहाणीही देशमुखांनी मांडली होती. स्वत:ची कौटुंबिक पार्श्वभूमी, ब्रुक बॉंड या चहाच्या कंपनीत भारी पगारावर केलेली विक्री-अधिकाऱ्याची नोकरी, नंतर ती सोडून अनंत भालेरावंच्या ‘मराठवाडा’ दैनिकात विनावेतन केलेले काम, ‘मराठवाडा’ का बंद पडले याची कारणमीमांसा, नंतर केलेले प्लॉटविक्री-शेती-अभ्यासिका इत्यादी व्यवसाय, त्यांत मिळवलेले उज्ज्वल आर्थिक यश, प्रभाकर झरकर या बालमित्राने दिलेल्या भेटवर्गणीमुळे अंतर्नाद मासिकाशी झालेला परिचय, आणि आता वयाची पंच्याहत्तरी उलटल्यावर साहित्यक्षेत्रात काहीतरी करायची तीव्र इच्छा या सगळ्याची विस्तृत माहिती त्या आठ पानी टंकलिखित पण अत्यंत प्रांजळपणे लिहिलेल्या पत्रात होती. अशी पत्रे एकूण दुर्मिळच. साहजिकच देशमखुांविषयी एक आदरमिश्रित आपुलकी मनात निर्माण झाली आणि नंतरच्या प्रत्येक प्रत्यक्ष भेटीत ती दृढावत गेली.

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

This Post Has 5 Comments

 1. लेख अतिशय अंतर्मुख करतो. अशी समाज सेवा करणारी जेष्ठ मंडळी पाहिली की व्यक्त व्हायला शब्द अपुरे पडतात. त्यांचे हे सर्वस्व वाहून केलेले काम बघून खरंच त्यांना माझे लक्ष लक्ष प्रणाम. वर्षाची सुरवात फ़ारच सकस लेखानी झाली. धन्यवाद.

 2. अशीच माणसे आपली कला, संस्कृती जातं करतात.

 3. मूळ ऑंगस्ट २००९ चा अंकातील लेख व आवाहन आणि त्या वयातील श्री देशमुख यांची जिद्द केवळ अप्रतिम आहे.
  मलाही त्या योजनेचा लाभ घेण्याचे भाग्य लाभले. सातही पुस्तके वाचून झाली पण प्रतिक्रिया
  देण्याचे काही कौटुंबिक धावपळीत राहूनच गेले.पण पैसे मिळाल्यावर श्रीयुत देशमुख यांचा
  फोन आला होता व मुंबईत येईन तेव्हा जरूर भेटू असा संवाद ही झाला होता.पण तेही राहून
  गेले. त्या योजनेतील जे स्पिरीट होते त्याची आठवण या लेखाने झाली .धन्यवाद.

 4. व्वा ! अत्यंत प्रेरक ..मार्गदर्शक लेख …

 5. किती अप्रतिम लेख आहे. शीर्षक देखील अगदीच साजेसे. देशमुख काकांच्या कार्याला सलाम🙏👍👍

अभिप्राय द्यायला विसरू नका...

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Close Menu
%d bloggers like this: