या भवनातील गीत पुराणे…

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व म्हणून प्रेमाने,आपुलकीने आणि आदराने गौरवले जाणारे पु.ल.देशपांडे यांची जन्मशताब्दी सध्या मोठ्या उत्साहात साजरी होत आहे.पण जेंव्हा पु लंचे लेखन ऐन भरात होते तेंव्हाही ‘ते स्मरणरंजनात रमतात’,‘ते समाजातल्या एका विशिष्ठ वर्गाचे ( मध्यमवर्ग ?? ) प्रतिनिधित्व करतात’,‘त्यांना ताकदीचे आणि दीर्घ स्वरुपाचे लेखन जमणारच नाही ’ … असे आक्षेप घेतले गेले होतेच की पण आजही त्यांची वाचकप्रियता कमी झालेली नाही. पण इंटरनेट आणि आय पॅडच्या जमान्यातील पिढीचे त्यांच्या साहित्याशी नाते खरोखरच जुळले आहे का ?पु.लं.च्या लेखनाचा विषय असलेल्या व्यक्ती,जागा आणि संस्था आज नावालाही दिसत नाहीत तरीही त्यांचे साहित्य का वाचले जाते?का केवळ परंपरेनं चालत आलेल्या आणि म्हणून आदरणिय मानलेल्या गोष्टींसारखे पु लंचे साहित्य ठरले आहे ? अशा प्रश्नांकडे स्वतःच्या नजरेने पाहण्याचा,वस्तुनिष्ठपणे त्यांची उत्तरे सोधण्याचा आजच्या वर्तमानातील लेखिका, चौफेर वाचक मेघना भुस्कुटे यांचा प्रामाणिक प्रयत्न म्हणजे मुक्त शब्द मधील लेख ‘ या भवनातील गीत पुराणे ’ … 

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

This Post Has One Comment

  1. पुलंच्या लिखाणाचा एका वेगळ्या चष्म्यातून पाहिलेला दृष्टीकोन आवडला. ‘पुल’ च नव्हे तर प्रत्येक लेखकाचे लिखाण कालसुसंगत असते. माझ्या भाच्याला जेम्स बॉंड चा सिनेमा दाखविल्यावर तो म्हणाला “त्याच्याकडे मोबाईल नव्हता”? असो.

    पुलंच्या लिखाणातील अनेक संदर्भ कालबाह्य झाले आहेत हे निश्चित. महाभारतातील देखील, कुठचाही संदर्भ आज लागू होत नाही. पण मनुष्यस्वभाव कधीच बदलत नाही. “व्यासोछिष्ट्म जगत सर्वम्” म्हणतात ते याच कारणासाठी.

    पुलं चे मानवी स्वभावाचे सूक्ष्म निरीक्षण आणि निर्विष विनोदी पद्धतीने मांडणी आजही जवळची वाटते. एक उदाहरण द्यायचे तर स्वामी, बुवा, बापूंचे भक्त “कायकिणी” आजही आपल्या आजूबाजूला आहेतच.

    त्यामुळे लेखनातील अनेक संदर्भ कालबाह्य झाले असले तरी मूळ गाभा सशक्त असल्याने पुलं चे लिखाण कधीच कालबाह्य होणार नाही.

    मात्र, एक अनोखा दृष्टीकोन (बहुधा प्रथमच) मांडल्याबद्दल मेघना भुस्कुटे यांचे अभिनंदन..

अभिप्राय द्यायला विसरू नका...

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Close Menu
%d bloggers like this: