कोरोनाच्या सावटाखालचा दिवाळी अंक


अंतर्नाद दिवाळी २०२०

आज कोविड १९ रोगाच्या साथामुळे अवतीभवतीचे सगळेच जीवन झाकोळून गेले आहे. लक्षावधी लोक या साथीत आजवर दगावलेही आहेत. कोरोनासंकटाचा उल्लेख टाळून है संपादकीय लिहिणे त्यामुळे अशक्यच आहे.

ज्या पांढरपेशा वर्गात बहुसंख्य मराठी वाचकवर्ग मोडती, त्याच्या डोक्यावर निदान हक्काचे छप्पर तरी आहे आणि जगण्यासाठी आवश्यक ते अन्न, भाजीपाला, औषधे हे सारे आजही घरपोच मिळते. पण या प्राथमिक गरजा भागणे यातच आयुष्याची सार्थकता मानता येणार नाही. आसपासच्या समाजाशी आपण जोडलेले असतो. प्रवास, नाटक, सिनेमा, संगीताचे व साहित्यिक कार्यक्रम, ग्रंथालये, नातेवाईक व मित्र यांच्या गाठीभेटी, त्यातून होणारी भावनिक-वैचारिक देवाणघेवाण या साऱ्यांतून आपले जीवन अधिक अर्थपूर्ण होत असते. दुर्दैवाने, मार्चनंतरच्या आठ महिन्यांत बाह्य जगाशी थेट असा काही संबंध उरलेला नाही. सोशल मीडिया आणि मोबाइल एवढ्यापुरताच इतरांशी संबंध इतकी लांबलेली अशी घरबंदी ही आयुष्यातली पहिलीच. जेवढी माणसाची प्रगती होत जाते तेवढी त्याची मुक्त संचार करण्याची क्षमता वाढत जाते असे मानले जाते. पायी चालणे, सायकल, मोटारी, आगगाड्या, विमाने हा माणसाच्या संचारक्षमतेचा चढता आलेख हा त्याच्या प्रगतीचाही चढता आलेख आहे. त्या प्रगतीच्या वाटेवर आपण सध्या खूप मागे फेकले गेली आहोत असे वाटत राहते म्हणूनही ही घरकैद इतकी अस्वस्थ करते.

 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


अंतर्नाद दिवाळी २०२० संपादकीय

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen