आज २००१ साली जयप्रकाश नारायण


अंक : अंतर्नाद दिवाळी २०२०

१९७२ नंतर देशात एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली. काँग्रेसची राजवट 'फेल' गेली होती आणि विरोधक पर्याय देऊ शकले नव्हते. १९६७ साली देशभर कांग्रेस विरोधाची लाट उसळली आणि अनेक राज्यांत गैरकग्रेसी सरकार आली. त्या काळातले समाजवादी व जनसंघी त्या सरकारात होते. त्यांना वेळ फार मिळाला नसला तरी त्यांना काम जमत नाही. देशाचे प्रश्न सोडवणं त्यांना जमत नाही असं लोकांना वाटलं, काँग्रेस आणि विरोधक दोघंही सारखेच 'बेकार' आहेत अशी भावना लोकांमध्ये पसरली.

देशात बेकारी वाढत होती. विषमता वाढत होती. खेड्यांची देना होत होती. अडाणीपण वाढत होतं. आरोग्याची हेळसांड झाली होती. भ्रष्टाचारानं कळस गाठला होता. थोडक्यात असे की देश हलाखीत होता. परिस्थिती वाईट आहे आणि राजकीय पक्ष त्यातून वाट काढू शकत नाहीत ही भावना देशात, विशेषतः तरुणांत, बळावली. राजकारण, राजकीय पक्ष, पुढारी यांना लोक विटले होते. संतापलेली मुलं रस्त्यावर उतरली आणि गुजरातेत नवनिर्माण आंदोलन सुरू झालं. आंदोलनाचा राग सर्वच राजकीय पक्षावर होता.

अचानक जेपी या आंदोलनाच्या नेतृत्वपदी पोचले. तरुणांनी त्यांना ओढून नेतृत्वपदी बसवलं जेपी तयार नव्हते. परंतु तरुणांची, देशाची दैना पाहवत नसल्यानं ते आंदोलनात पडले. देशातली परिस्थिती आमूलाग्र बदलली पाहिजे, संपूर्ण व्यवस्थाच बदलली पाहिजे, किरकोळ बदलानं भागणार नाही, केवळ एका राजकीय पक्षाची किंवा व्यक्तीची सत्ता घालवून उपयोगाची नाही, मुळातून समाजात । बदल केला पाहिजे असं ते म्हणाले, नवनिर्माण आंदोलनाचे रूपांतर त्यांनी संपूर्ण क्रांतीच्या आंदोलनात केलं. चिमणभाई पटेल आणि इंदिरा गांधींच्या सरकारविरोधातलं आंदोलन त्यांनी पक्षीय परिघाबाहेर नेऊन सर्वसमावशेक केलं.

 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


अंतर्नाद दिवाळी २०२० , व्यक्ती विशेष , राजकारण , समाजकारण

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen