पहिले महायुद्ध

पुनश्च    मुकूल रणभोर    2019-12-10 06:00:50   

6 ऑगस्टलाच म्हणजे लीजने कडवा प्रतिकार सुरू करून जर्मन सैन्याचा भरधाव सुटलेला वारू रोखल्याला दोनच दिवस झाले असताना जर्मनीने लीज वर झेपेलिन वायुयानातून तुफान बोंबफेक केली होती. युद्धात सैन्याबरोबर जनता ही होरपळली जाते. पूर्वी ही असे होत असे, हे खरे, पण आता युद्धाचा, आक्रमणाचाच एक भाग म्हणून शत्रू राष्ट्रातील जनतेला लक्ष्य करून त्यांचा संहार करणे, त्यांच्यात दहशत निर्माण करणे हे तंत्र अभिनव होते, क्रूर आणि अश्लाघ्य होते आणि पहिल्या महायुद्धात तरी ते प्रथम जर्मनांनीच वापरले होते. एका अर्थी सांगायचे तर पूर्वी सैन्याने आक्रमण करताना शत्रू राष्ट्राच्या  संरक्षक फळ्या भेदून त्यांच्या भूप्रदेशात शिरकाव केल्याशिवाय सर्वसामान्य जनतेला काही उपद्रव होऊ शकत नसे. पण विसाव्या शतकात विमाने आणि वायुयान ही नवीन आयुधं सैन्याकडे आली. सर्व सामान्य जनतेत दहशत माजवणे आणि देशातील महत्त्वाची शहरं लष्करी ठाणी इ. लक्ष्य करता यावीत म्हणून त्यांचा पहिल्या प्रथम वापर जर्मनांनीच केला. विमानं तेव्हा अगदीच प्राथमिक अवस्थेत होती आणि त्यांचा सीमेलगत शत्रू सैन्याच्या हालचाली टिपणे भूप्रदेशाची छायाचित्रे घेणे थोडक्यात सांगायचे तर टेहेळणी करणे एवढाच मर्यादित उद्देश होता. ती इतकी नाजूक असत, वारंवार नादुरुस्त होत आणि कमी उंचीवरून उडू शकत असल्याने शत्रूला सहज टिपता येत असल्याने वैमानिकांचे आयुष्य अक्षरश: तासात ते 1-2 दिवसात मोजले जात असे. त्यामुळे सुरुवातीला विमानांचा वापर मर्यादित होता अर्थात हे चित्र फार लवकर बदलले.   दिनांत ह्या बेल्जियम- फ्रेंच सीमेजवळच्या शहरात जर्मन सैन्य पोहोचले तेव्हा त्यांनी रस्ते, लोहमार्ग नदीवरचे पूल इ. उध्वस्त केलेले पहिले. फ्रेंच आणि बेल्जियन सैन्याने प्रतिकार न करताच पळ काढला ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


इतिहास , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रिया

  1. Apjavkhedkar

      5 वर्षांपूर्वी

    पुढील भागात काय असेल याची उत्सुकता आहे.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen