अंक : महा अनुभव, ऑक्टोबर २०२१
दह्याचं विरजण, ब्रेडचं कल्चर म्हणजे पिढ्यान्पिढ्या सांभाळलेल्या सूक्ष्म पेशी असतात. अशा पेशी संशोधकांसाठी का महत्वाच्या असतात, पेशींशी त्यांचं नातं कसं तयार होतं, त्याची ही रंजक गोष्ट.
********
१२-१५ वर्षापूर्वी शिक्षणासाठी अमेरिकेत आले तेव्हा स्लीपिंग बॅग, दोन बॅगा, चार भांडी, काही पुस्तकं आणि दोन रुममेटस् इतकाच माझा संसार होता. दिवसाचा बहुतेक वेळ युनिव्हर्सिटी कँपसवरच अभ्यास, रीसर्च, खेळ, मित्रमंडळींसोबत टाईमपास यांत जायचा. घरी आल्यावर अभ्यास, घरातली नेमून दिलेली कामं या सगळ्याच्या वेळेचं नियोजन करून हाताशी फार कमी वेळ असायचा. भारतात असताना वरण-भाताचा कुकर, चहा आणि मॅगी यापलीकडे स्वयंपाकाशी फारसा संबंध न आल्याने अमेरिकेत आपसूकच ‘रेडी टू इट’ च्या दुनियेत माझा प्रवेश झाला. आमटी-भात (खाताना त्यात चिप्स घालायच्या), तव्यावर भाजून लगेच तयार होणार्या पोळ्या, राजमा - मिक्स व्हेजिटेबल - छोले यातली एखादी भाजी, डब्यातलं दही आणि कधीतरीच चैन म्हणजे भारतीय दुकानात मिळणारं रेडीमेड लोणचं- हेच विद्यार्थी दशेतलं रोजचं जेवण. मग अशावेळी गावातले एखादे प्रेमळ काका-काकू, आजी-आजोबा कधी काही निमित्ताने आम्हा विद्यार्थ्यांना घरी जेवायला बोलवायचे. अशा वेळी विस्मरणात जाऊ लागलेल्या आवडीच्या पदार्थांच्या चवी घेण्याचा योग यायचा. त्यातलाच एक साधा पण खास पदार्थ म्हणजे दही.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Viraj Londhe
4 वर्षांपूर्वीखूपच छान लेख