fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

पान लागलं तेव्हा…

अंक:- श्रावण; वर्ष:- दिवाळी १९९४

हा लेख ऐकण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

१२ जून १९८० ची सकाळ. वार गुरुवार, वेळ सकाळचा ८ चा सुमार असेल. रेस्कॉन कंपनीला सुट्टी असल्यामुळे जरा उशिराच उठलो होतो. बाहेर बुलेट मोटारसायकलचा आवाज आला म्हणून डोकावलो, तर दारात माझा मित्र डॉ. विवेक परांजपे हजर. मी त्याला विचारले, “अरे एवढ्या सकाळीच काय काम काढलेस?” त्यावर तो बोलला, “आज एका शाळेत माझे व्याख्यान आहे व त्यासाठी मला एक चांगला नाग दे.” डॉ. विवेक परांजपे हा ‘फ्रेंडस् ऑफ अॅनिमल्स’ या संघटनेचा निर्माता व मुख्य प्रवर्तक होता व तो सर्पासंबंधीच्या गैरसमजुती व भीती लोकांच्या मनातून दूर करणे, यासाठी आपल्या संघटनेतर्फे निरनिराळ्या ठिकाणी जिवंत साप बरोबर नेऊन व्याख्याने देत असे.

त्यावेळेला माझ्याजवळ विषारी-बिनविषारी असे पन्नासच्या आसपास साप होते, त्यात डझनभर नाग होते. मला विवेकने नाग मागितल्यावर मी पिंजऱ्यातून चार मोठे व निवडक नाग माझ्या ‘हूकस्टीक’ने बाहेर काढले. ते चारही नाग संथपणे फणा काढून आमच्या हालचाल पाहात उभे होते. आणि तेवढ्यात विवेकचे लक्ष एका बाजूच्या पिंजऱ्यात ठेवलेल्या नागाकडे गेले व त्याने मला त्या नागासंबंधी विचारणा केली की, ‘हा नाग सुंदर दिसतोय. केव्हा पकडलास?’ मी त्याला सांगितले, की त्याला पकडून फक्त पाच दिवस झाले आहेत. त्याने तो नाग मला बाहेर काढावयास सांगितले. मी शांतपणे ‘हूकस्टीक’ने त्या नागाला पिंजऱ्यातून बाहेर काढला व समोर जमिनीवर ठेवला, क्षणार्धात तो साडेचार फुटी नाग आपला फणा उभारून जवळजवळ दीड फूट उभा राहिला. तो त्वेषाने थरथरत होता. त्याचा फणा पातळ; परंतु रुंद होता व त्यावरची द्विवलयांकृत मुद्रा अत्यंत रेखीव व स्पष्ट होती. अंगकांती हिरवट तपकिरी व सतेज होती. एकंदरीत हा नाग इतर नागांपेक्षा दिसण्यात सरस होता.

या वेळेला परिस्थिती अशी होती की,मध्ये मी उभा,माझ्या पाठीमागे दोन मोठे नाग फणा काढून उभे होते. पुढे दोन पूर्ण वाढलेले नाग उभे होते व माझ्या अगदी समोर तो नवीन नाग उभा होता. पाचही यमदूत योग्य संधीची वाट पाहात विवेकच्या पायांच्या हालचालीच्या अनुषंगाने डोलत होते.

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘श्रवणीय’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘श्रवणीय’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 3 Comments

  1. नाग चावला तेव्हा समोर विवेक सारखा डॉक्टर होता . पाचही नागांना परत पिंजरा बंद केले इतपर्यंत ठीक आहे. पण नंतर आणखी एक नाग हाताळून व्याख्यानासाठी पिंजर्यात बरोबर घेणे नंतर विवेक सारख्याने लेखकाला फिल्म इन्स्टिट्यूच्या दारात वाट पहात ठेवणे हा शुध्द बेजाबदार बावळटपणा आहे. नागदंश झाल्यावर अँटी व्हेनम शिरेतून द्यायला सुरवात करे पर्यंतचा प्रत्येक क्षण मोलाचा आहे. पुण्यातल्या हॉस्पिटल स्टाफचे वर्तन तसेच चुकीचे होते. निष्काळजीपणे वागून मित्रमंडळींना व नातेवाईकांना जो त्रास दिला या बद्दल यांना सणसणीत दंड ठोठावयास हवा.

  2. खूप चॅन. दूरदेशी निघालेलाय माणसाचे खरे वर्णन .

  3. सुदंर शब्दात उतरवलंय,

Leave a Reply

Close Menu