श्वानप्रेम आणि भूतदया

कुत्रे जमातीवर भूतदया दाखवणाऱ्या लोकांकडे बघून मला फार भरुन येतं.

आपल्या घरातल्या राहिलेल्या पोळ्या भाकरी ब्रेड घेऊन हे लोक सोसायटीच्या बाहेर येतात. लगेच कुत्र्यांचं एक टोळकं जमा होतं. सुरक्षित अंतर ठेवून हातभर लांबूनच कुत्र्यांच्या दिशेने पोळीचे तुकडे भिरकावणं चालतं. हे झालं की मग हात पुसून घरी जाताना यांच्या मुखकमलावर मुक्या प्राण्यांवर दया दाखवली वगैरे समाधान निथळून वहात असतं.याहीपेक्षा वरची कडी असे एक काका मला माहित आहेत. ते फिरायला येताना गाडीवर येतात. गाडी टेकडीच्या पायथ्याशी लावतात. टेकडीवर फिरुन आले की गाडीला किक मारायच्या आधी खिशातून दोन पारलेजीचे पाच रुपयेवाले पुडे काढतात. गाडीला किक मारतात आणि बिस्किटं टाकत टाकत जातात.

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'निवडक' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'निवडक' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 2 Comments

  1. हा आमचा रोजचंच अनुभव आहे ,कोथरूड भागात टोळक्याने कुत्री असतात, बाहेर चालायला जाणे धोकादायक झाले आहे

  2. त्या माणसाने दुसरी लाथ खिशातून बिस्कीट घेऊन येणाऱ्या माणसाला घातली नाही हे नशीब

Leave a Reply

Close Menu