कथा कोहिनूरची


३ जुलै १८५० रोजी ’कोहिनूर’ हिरा इस्ट इंडिया कंपनीच्या अध्यक्षांनी भारतातुन आणलेला इंग्लंडच्या राणीच्या स्वाधीन केला. कोहिनूर (अर्थ- प्रकाशाचा पर्वत) हा जगातल्या सर्वात प्रसिद्ध हिर्‍यांपैकी एक आणि एकेकाळी जगातला सर्वात मोठा असलेला मूळचा भारतीय हिरा आहे. कोहिनूरचा इतिहास रंजक कथांनी भरलेला आहे. हा हिरा कधीच कोणी विकला किवा खरेदी केला नाही. मात्र त्याने कितीतरी मालक बदलले. कोहिनूरचा इतिहास हा खून, लढाया, सत्ता व शोकांतिकांचा इतिहास आहे. काही सूत्रांनुसार कोहिनूर सुरुवातीस फारसा चमकदार नसून, थोडा मळकट व पिवळसर रंगाचा होता. सुमारे चार हजार वर्षांपूर्वी तो भारतातील गोवळकोंडा येथील खाणीत सापडला असावा. एका कथेप्रमाणे, सूर्याने सत्राजित राजाला दिलेला हाच तो स्यमंतक मणी. सत्राजिताचा भाऊ प्रसेन हा हिरा बरोबर घेऊन शिकारीला गेला होता. तिथे एका सिंहाने त्याला मारून तो मणी नेला. पुढे जाम्बुवंताने सिंहाला मारून मणी हस्तगत केला. मात्र मणी चोरल्याचा आळ आला श्रीकृष्णावर. श्रीकृष्णाने मण्याचा शोध घेऊन पुढे जाम्बुवंताशी युद्ध केले. अखेरीस जाम्बुवंताने श्रीकृष्णाला शरण जाऊन त्याला मणी व आपली कन्या जाम्बुवंती अर्पण केली. श्रीकृष्णाने स्यमंतक मणी सत्राजितास परत केला. पुढे सत्राजिताची मुलगी सत्यभामा हिच्याशी श्रीकृष्णाचा विवाह होऊन श्रीकृष्णाला स्यमंतक मणी वरदक्षिणेत मिळाला. त्यानंतर श्रीकृष्णाने तो सूर्याला परत केला असे म्हणतात. त्यानंतर १६ व्या शतकामधे आलेल्या बाबर बादशहाचा इतिहास, बाबरनामा (इ. सन १५२६ ते १५३०), यात या हिर्‍याचा उल्लेख येतो. मे १५२६ मधे बाबर जेव्हा आग्रा येथे आला, तेव्हा तेथील राजा विक्रमादित्य याने तो दिला असावा. पुढे हिरा बाबराचा मुलगा हुमायून याच्याकडे गेला. पु ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


इतिहास , महाराष्ट्र टाईम्स , ज्ञानरंजन , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रिया

  1. bharatik64

      5 वर्षांपूर्वी

    Info छान आहे

  2. bookworm

      5 वर्षांपूर्वी

    कोहिनूरबद्दल माहितीत बरीच भर पडली.

  3. Sunanda

      5 वर्षांपूर्वी

    लेखकाचे आडनाव विद्वांस हवे.

  4. schoudha

      5 वर्षांपूर्वी

    Informative



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen