अंक – आनंद, मे १९३७
एक होता गरीब ब्राह्मण. त्याला वाटले की, आपण सगळ्यांत श्रेष्ठ व्हावे. म्हणून त्याने देवाची खूप प्रार्थना केली. त्याच्या प्रार्थनेमुळे देव त्याच्यावर प्रसन्न झाला. त्याने त्यास दर्शन दिले. देवाने “वर माग” असें म्हणताच “मला सगळ्यांत श्रेष्ठ कर!” असा ब्राह्मणाने वर मागितला. देवाने विचारले, “मी तुला कोणाइतके श्रेष्ठ करूं?” ब्राह्मणाला विचार पडला. त्याने देवाजवळून सात दिवसांची मुदत मागून घेतली व “सगळ्यांत श्रेष्ठ कोण?” ह्याचा तपास करण्याकरितां तो प्रवासास निघाला.
प्रथमच त्यास एक सावकार भेटला. त्याचा तो थाटमाट वगैरे पाहून ब्राह्मणास वाटलें की, “सावकारच सगळ्यांत श्रेष्ठ. आपणही सावकारच व्हावे.” पण इतक्यांत राजाचे नोकर आले व त्यांनी सावकारास पकडून राजाकडे नेले. राजाने सावकारास राजद्रोहाच्या आरोपावरून ठार केले. ब्राह्मणास वाटले की, “राजाच सगळ्यांत श्रेष्ठ आहे.” म्हणून तो ब्राह्मण “मला राजा कर” असा वर मागण्याकरितां देवाकडे जाणार
Rdesai
19 Jul 2019लेख छान आहे.आपल्या लेखातुन मानवीस्वभावाचे दर्शन घडते