fbpx

‘ब्रीच कँडी’ची जन्मकथा

इंग्रजांच्या ताब्यात मुंबई यायच्या अगोदरही मुंबईवर अनेक राजे-सुलतान व पोर्तुगीजांसारख्या युरोपियनांचे राज्य होतं परंतु या कोणाच्याही मनात मुंबईची बेटं जोडून एकसंघ शहर करावे असे आले नाही..कदाचित आलेही असेल परंतु त्याकाळची राजकीय अस्थिरता आणि द्रव्याची कमतरता या मुळे ते शक्यही झालं नसेल..चलाख इंग्रजांच्या मनात मात्र हे शहर त्यांच्या ताब्यात आले तेंव्हापासून ही योजना असावी..आणि त्यामुळेच त्यांनी पोर्तुगीज राजकन्येशी आपल्या राजाच्या लग्नाचा घाट घालून तो यशस्वीपणे घडवून आणला असण्याची शक्यता जास्त वाटते..

इस्ट इंडिया कंपनीने १६७१-७२ साली गव्हर्नर जेराल्ड ऑन्जीयर याला मुंबईचा गव्हर्नर म्हणून नियुक्त केले. मुंबईच महत्व ओळखलेला हा एक द्रष्टा इंग्रज. अनेक इतिहासकार मुंबईचा जनक (फादर ऑफ बॉम्बे ) म्हणतात. तेंव्हाच्या मुंबईच्या विकासाला पहिली चालना दिली ती या इंग्रजाने. ऑन्जीयरच्या मनात मुंबईची विखुरलेली बेट भरणी घालून एकसंघ करण्याची योजना इथे आल्यापासून घोळत होती. तशी मंजुरीही त्याने त्यांच्या हेड ऑफिसकडे म्हणजे इंग्लंडकडे मागितली होती परंतु इस्ट इंडिया कंपनी नफ्या-तोट्याचा विचार करणारी व्यापारी कंपनी असल्याने एवढा खर्च करणे शक्य नसल्याचे त्यांनी उत्तर दिलं. तरी ऑन्जीयर व त्यांच्या नंतर आलेल्या अनेक ब्रिटीश गव्हर्नरानी आपले प्रयत्न चालू ठेवले..

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'फ्रिमीयम' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'फ्रिमीयम' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 4 Comments

  1. विकिपीडिया

  2. एक सुधारणा..
    माडगावकरांचे “मुंबईचे वर्णन” १८६३ सालचे आहे.. १९६३ नव्हे. चुकीचे लिहिले गेले.
    क्षमस्व.

  3. अतिशय माहिती पूर्ण लेख आवडला. मी पण गिरगावची असल्याने जुन्या आठवणी जाग्या झाल्या. मुख्य म्हणजे जुनी मुंबई डोळ्या समोर उभी राहिली. छान.

  4. खूपच छान माहिती.

    मी सध्या डोंबिवलीत वास्तव्यास असलो तरी मुळचा गिरगावकर असल्याने, १९८० पूर्वीच्या मुंबई विषयी प्रचंड आत्मीयता आहे. माडगावकरांचे १९६३ सालचे “मुंबईचे वर्णन” वाचल्यापासून आणि एकंदरीतच ब्रिटीश राजवटीतील मुंबईचे फोटो आणि युट्युब वर उपलब्ध असलेले अगदी थोडे व्हिडीओ पाहून मला नेहेमी वाटते, “काश ! मै उस वक्त पैदा हुआ होता !!! ”

Leave a Reply

Close Menu