fbpx

मराठी भाषा- तंत्र आणि मंत्र- भाग २३

मराठीभाषा ६९ – अखिल /निखिल

‘अखिल मानव जातीला….’ किंवा ‘अखिल भारतात’ असे काही शब्दबंध आपण वापरीत असतो.

खिल हा संस्कृत शब्द आहे. वेदामधल्या काही विशेष सूक्तांसाठी तो वापरला जातो. व्यासांनी ऋग्वेदाच्या दहा मंडाळांमध्ये सर्व सूक्तांची वाटणी केल्यावरही त्यांच्या लक्षात आले की, तरीही काही सूक्ते शिल्लक राहिलीच! मग त्या शिल्लक अथवा बाकी राहिलेल्या सूक्तांना नाव दिले गेले, ‘खिल सूक्ते’. म्हणून खिल म्हणजे बाकी! अशी बाकी ज्यात नाही, त्याला म्हणायचे अखिल! म्हणजे पूर्ण!

‘खिल’ म्हणजे शेतजमीन नांगरून होत असताना नांगरायचा शिल्लक राहिलेला (किंवा कदाचित मुद्दाम ठेवलेला) जमिनीचा मोकळा भाग असाही एक अर्थ सापडतो.‘खळं’ हा शब्द या ‘खिल’चेच परिवर्तित रूप दिसते.

अखिल (परिपूर्ण, बाकी काही न ठेवता विचारात घेतलेले) आणि निखिल या दोन शब्दांमध्ये बरेचसे अर्थसाम्य आहे; पण थोडा अर्थभेदही आहे.

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'फ्रिमीयम' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'फ्रिमीयम' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 2 Comments

  1. बघून सांगते

  2. ‘ पहिले पाढे पंचावन्न’ या वाक्प्रचाराची व्युत्पत्ती काय?

Leave a Reply

Close Menu