पूरग्रस्तांचा खराखुरा हिरो

कृष्णा नदीकाठी महापुराने थैमान घालत असताना आपला जीव धोक्यात घालून दुधोंडी पासून पश्चिमेकडील सुमारे तीन किलोमीटरवरील माळी वस्ती ,सती आई मंदिर परिसर व जुने घोगाव अशा भागातील पूर बाधित सुमारे पाचशे पेक्षा जास्त नागरिकांना आपल्या छोट्याशा कायलीतून सतत चार दिवस तीनशे फेऱ्या मारून पुरातून सुरक्षितपणे बाहेर काढणारा हा पंचावन्न वर्षाचा अवलिया म्हणजे रामदास उमाजी मदने!

आपल्याला आश्चर्य वाटणारी ही बाब खरंच फक्त सांगली जिल्ह्यालाच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रालाअभिमानास्पद ठरावी अशी कामगिरी या एका 55 वर्षाच्या साठीकडे झुकलेल्या या माणसाने केली आहे.दुधोंडी तालुका पलुस जिल्हा सांगली येथे राहणारा हा माणूस नदीकडच्या घरात राहूनही,सध्या पूरबाधित असूनही माणुसकी बद्दल अपार प्रेम असणारा आम्हाला दिसला.

या माणसाचं घर जमिनीपासून दहा फूट उंचीवर असून सुद्धा घरात चार फूट पुराचे पाणी घुसले होते. तरीही या माणसाने आपले कुटुंब इतरत्र हलवले परंतु महापुराच्या पाण्यात आपण मात्र स्वतः दिवसभर छोट्याशा काहिली द्वारे आपलं काम सुरू ठेवून 500 नागरिकांना पुरातून बाहेर काढण्याचे काम सलग चार दिवस तीनशे फेऱ्यातून केले आहे.

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'निवडक' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'निवडक' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

Leave a Reply

Close Menu