fbpx

जागतिक अर्थकारणाला ओहोटी – दै. लोकमत

निवडक अग्रलेख – दिनांक १४ ऑगस्ट २०१९

लोकसत्तेचा अग्रलेख हॉंगकॉंग आणि चीन यांच्यातील तणावाचे चित्रण करतोय. प्रत्यक्ष एकही वाक्य आपल्याबद्दल न लिहिता, आंतरराष्ट्रीय घटनांचा संबंध भारतातील परिस्थितीशी जोडण्याची एक आगळी शैली गिरीश कुबेरांनी विकसित केली आहे. तिचा उत्कृष्ट नमुना म्हणजे आजचा अग्रलेख.

पाकिस्तानच्या अगतिकतेवर ‘सकाळ’चा अग्रलेख वाचनीय आहे. मटा ने ‘ निर्णयानंतरचे आव्हान ‘ या लेखातून काश्मीर प्रश्नावर सरकारला सावधगिरीचा इशारा दिला आहे. ‘ प्रहार ‘ ने दहावी परीक्षेच्या गोंधळावर लिहिलेला अग्रलेखही पालकांच्या जिव्हाळ्याचा असल्याने वाचनीय झाला आहे.  ‘काश्मीरनंतर बलुचिस्तान’ हा पुढारी चा अग्रलेख तर फारच आक्रमक आणि जबरदस्त लिहिलाय.

पण आजचा निवडक अग्रलेख ‘ दै. लोकमत’ चा निवडला आहे. सध्याची आर्थिक स्थिती, वाहन उद्योगापासून आयटी पर्यंत सर्वच सेक्टर्स ना जाणवणारी मंदी, त्याची जागतिक कारणे, या सर्वांचा थोडक्यात आणि तरीही माहितीपूर्ण उहापोह  या छोटेखानी अग्रलेखात केला आहे. त्यामुळे विषय, माहिती, आणि भाष्य या तीनही अंगांनी हा अग्रलेख सरस वाटतो.

या लिंकवर क्लिक करून अग्रलेखाचा आस्वाद घ्या.

https://www.lokmat.com/editorial/downfall-global-economy/

दै. लोकमत, संपादक – विनायक पात्रुडकर

**********

हा उपक्रम कसा वाटतोय हे आम्हाला जरूर कळवत जा. आपल्या सूचना, तक्रारी, आक्षेप नक्की नोंदवा. सदर अग्रलेखाबद्दल आपली प्रतिक्रिया द्या. आणि ही पोस्ट आवडल्यास नक्की शेअर करा. जेणेकरून अधिकाधिक वाचक याचा आस्वाद घेऊ शकतील.

सुधन्वा कुलकर्णी

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'फ्रिमीयम' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'फ्रिमीयम' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 5 Comments

 1. सदर वाचनीय असेल,वैचारिक खाद्य पुरवेल यात शंका नाही.

 2. इतर लेखांची लिंक पण इथे द्या

  1. प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद.
   कुठले लेख आपल्याला अपेक्षित आहेत ?

 3. खरंच स्तुत्य उपक्रम आहे. दररोज असा संक्षिप्त आणि तुलनात्मक संपादकीयांचा लेख वाचायला मिळाल्यास नक्की आवडेल. महत्त्वाच्या अग्रलेखा सोबत इतर लेखांची लिंक इथे जोडल्यास उत्तम.

  1. मनःपूर्वक धन्यवाद.
   अन्य कुठले लेख आपल्याला अपेक्षित आहेत ?

   हे विचारण्याचे कारण असे की, प्रत्येक वर्तमानपत्रांत अनेक विषयांवर अनेक लेख येत असतात. त्यातले वाचकांना आवडतील असे निवडणे कठीण आहे, याचे कारण व्यक्ती तितक्या प्रकृती. आता अग्रलेख ही एकच कॅटेगरी असल्याने त्याची तुलना आणि निवड जमू शकते. लेखांबाबत ते थोडं ट्रिकी वाटतंय 🙂

   काय म्हणता ?

Leave a Reply

Close Menu