fbpx

स्वातंत्र्यदिनापुढील आव्हाने ! – दै. महाराष्ट्र टाईम्स

निवडक अग्रलेख – दिनांक १५ ऑगस्ट २०१९

प्रहारचा अग्रलेख पारंपारिक स्वातंत्रदिन स्पेशल आहे. फक्त एकच त्यात उल्लेखनीय म्हणजे महाराष्ट्र हे महात्मा गांधी, शाहू, फुले, आंबेडकर, रानडे यांचं पुरोगामी राज्य असं म्हटलंय. आता गांधी महाराष्ट्राचे कसे हे उमगत नाही आणि रानडे यांचा उल्लेख फारच आश्चर्यकारक.

सकाळचा अग्रलेख पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची महापुराने झालेली दुर्दशा आणि सरकारकडून अपेक्षा यांचे वर्णन करतोय.

सरन्यायाधीशांनी यंत्रणावर नोंदवलेली निरीक्षणे आणि ताशेरे यांच्यावर भाष्य करणारा लोकसत्ताचा अग्रलेख गोल गोल विषय मांडून हातात फारसं काही देत नाही.

सामनाचा अग्रलेख टिपिकल स्वातंत्र्यदिन, काश्मीर, ३७०, हिंदुत्ववाद वगैरे वगैरे वळणाचा आहे. मुंबई तरुण भारत चा अग्रलेख सुद्धा स्वातंत्रदिनाच्या निमित्ताने स्वाभाविकपणे सरकारचे अभिनंदन कौतुक वगैरे असाच आहे. किरण ठाकूरांच्या बेळगाव तरुण भारतचा अग्रलेखही साधारण त्याच अंगाने जातोय, पण पाकिस्तानला खास झोडून काढणारा आहे. लोकमतचा अग्रलेख स्वातंत्र्यदिनाचा जनरल आढावा घेणारा..

पण याच विषयाला वाहिलेला असूनही मांडणीच्या दृष्टीने संतुलित आणि वाचनीय असलेला अग्रलेख आज महाराष्ट्र टाईम्समध्ये वाचायला मिळाला. त्यामुळे आजच्या निवडक साठी त्याची निवड केली आहे.

खालच्या लिंकवर क्लिक करून हा लेख वाचता येईल.

https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/challenges-ahead-of-independence-day/articleshow/70678244.cms

दै. महाराष्ट्र टाईम्ससंपादक – अशोक पानवलकर 

**********

सदर अग्रलेखाबद्दल आपली प्रतिक्रिया द्या. आणि ही पोस्ट आवडल्यास नक्की शेअर करा. जेणेकरून अधिकाधिक वाचक याचा आस्वाद घेऊ शकतील. तसेच हा उपक्रम कसा वाटतोय, हे आम्हाला जरूर कळवत जा. आपल्या सूचना, तक्रारी, आक्षेप नक्की नोंदवा.

सुधन्वा कुलकर्णी

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'फ्रिमीयम' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'फ्रिमीयम' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

Leave a Reply

Close Menu