कला : स्वायत्त की...? - दै. लोकमत


निवडक अग्रलेख - दिनांक २२ ऑगस्ट २०१९ मटा- चिदंबरम प्रकरणात ज्यांची राजकीय गणिते आहेत, ती काहीही असली तरी, अटकेच्या बातमीनंतर २४ तास चिदंबरम आणि त्यांच्या वकीलसेनेने केलेली पळापळ अत्यंत लाजिरवाणी आहे. तर सकाळचा अग्रलेख चिदंबरम प्रकरणाचे वर्णन करत असला तरी; त्याचा रोख सरकार कसे सूडबुद्धीने कारवाई करत आहे यावर अधिक्याने टीका करतोय. अर्थात कुठलेही थेट विधान न करता, याने अमुक करायला हवे, आणि त्याने तमुक करायला हवे वगैरे स्वरूपाचा पलायनवादी अग्रलेख लिहिण्यात आज सकाळ यशस्वी झाला आहे. 'उडत्या शवपेट्या' म्हणजेचं आपल्या भारतीय हवाईदलाची ४४ वर्षे जुनी मिग २१ विमाने. एअर चीफमार्शल धानोआंनी केलेल्या उल्लेखावर आधारीत लोकसत्ताचा अग्रलेख, भारतीय सैन्यदलांचे खर्च आणि आर्थिक तरतूद यातील भेदांवर वास्तववादी भाष्य करतो. ते वाचून चिंता आणि नैराश्य दाटून येतं. एकीकडे महापूर आणि दुसरीकडे कोरडा दुष्काळ अशी महाराष्ट्राची स्थिती झाली आहे. या सर्वांचा शेतीवर होणारा परिणाम, विजय केळकर समितीचा अहवाल न स्वीकारला जाण्याची खंत, आणि एकंदर पाण्याच्या अनुषंगाने शेतीप्रश्न ; असा साधारण प्रहारच्या अग्रलेखाचा नूर आहे. राज्यात निवडणुका कधीही जाहीर होतील. त्यामुळे आचारसंहिता लागू होण्याआधी आपापली कामे काढून घेण्यासाठी लोकांचा जीव खालीवर होत आहे. स्वाभाविकपणे मुंबईचे मंत्रालय आणि तिथे सध्या नेते, कार्यकर्ते आणि सामान्य जनता यांची गर्दी प्रचंड वाढली आहे. पण या विषयावरचा मंत्रालयातील गर्दी हा सामना चा अग्रलेख, जणू सातव्या पानावरील स्फुट असावे, अशा पद्धतीने लिहिलाय. दिव्य मराठीचा लघु अ ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


लोकमत , निवडक अग्रलेख , कला रसास्वाद , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रिया

  1. सुधन्वा कुलकर्णी

      5 वर्षांपूर्वी

    प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ... आणि आपले विधान पटले :)

  2. Haily Dalvi

      5 वर्षांपूर्वी

    अग्रलेखांबाबतचा उपक्रम स्तुत्य आहे. लोकमतातील अग्रलेखाबद्दल म्हणाल तर कालीदास हा थर्ड क्लास साहित्यिक मानायचा का? कारण त्याच्या बहुतेक कलाकृतींत राजकारणाचा लवलेशही नाही.

  3. सुधन्वा कुलकर्णी

      5 वर्षांपूर्वी

    धन्यवाद..समावेश करतो.

  4. shripad

      5 वर्षांपूर्वी

    मुंबई तरुण भारत?



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen