fbpx

..का बोभाटा झाला ‘जी’? – दै. लोकसत्ता

निवडक अग्रलेख- दिनांक २४ ऑगस्ट २०१९

‘मैं नही माखन खाऊं ‘ … अर्थात आजच्या दहीहंडीच्या निमित्ताने लिहिलेला, सकाळचा हा अग्रलेख या उत्सवाला आलेले बाजारू स्वरूप मांडतोय. तो चांगला आहेच, पण सुरुवातीला ऋतूबदलाचे जे वर्णन केले आहे, त्यातील शब्दलालित्य अतिशय भावणारे. https://www.esakal.com/sampadakiya/editorial-article-210161

काल एका वाचकाच्या सूचनेवरून मुंबई तरुण भारतही आमच्या यादीत समाविष्ट केला. कोल्हेकुईला सुरुवात हा त्यांचा अग्रलेख नाव न घेता आधी गिरीश कुबेरांना त्यांच्या दुटप्पी (?) भूमिकेवरून झोडून काढतो. पुढे नाव न घेता गांधी घराण्याला समर्पित असलेले, माजी संपादक कुमार केतकरांनाही जोरात चिमटा काढतो. आणि मग उर्वरीत भाग चिदंबरम आणि कॉंग्रेस यांची धुलाई करतो. यातील मजकूर जरी पटणारा असला तरी अग्रलेखापेक्षा हा फेसबुक पोस्ट अधिक वाटतो. असो … तूर्तास एवढेच. https://www.mahamtb.com//Encyc/2019/8/23/Mumbai-Tarun-Bharat-Editorial-on-P-Chidambaram-arrest-and-double-standards-of-media-groups.html

यशवंतराव यांना माफ करतील? … प्रामुख्याने कॉंग्रेस -राष्ट्रवादीचे नेते उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अडचणीत आले आहेत. राज्य सहकारी बँक घोटाळ्याच्या गुन्हेगारांवर आरोपपत्रे दाखल करण्याच्या आदेशांच्या पार्श्वभूमीवर या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेणारा नागपूर तरुण भारत चा अग्रलेख ठाक ठीक आहे. https://www.tarunbharat.net//Encyc/2019/8/24/agralekh-24-august-2019.html

तर याच घोटाळ्याचे साद्यंत वर्णन करणारा मटाचा अग्रलेख सविस्तर माहितीसाठी उपयुक्त आहे. https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/fir-may-spell-trouble-for-msc-bank/articleshow/70807344.cms

लोकमत– {{ देशात जातीय व धार्मिक उन्माद जसजसा वाढत आहे, तसतशी अर्थव्यवस्था खचत आहे. नेते बोलत नाहीत, मंत्री गप्प आहेत, माध्यमे गळाठली आहेत, विरोधक दुबळे आहेत आणि विचारवंतांना सत्य सांगण्याचे धाडस होत नाही. देशाची अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर पाचव्या क्रमांकावरून सातव्या क्रमांकावर आली आहे. बेकारीचा दर सहा टक्क्यांच्या पुढे, म्हणजे ७ कोटी ६० लाखांवर गेला आहे. गेल्या एकाच वर्षात, २०१८-१९ मध्ये १ कोटी १० लाख लोकांनी त्यांचा रोजगार गमावला आहे. बीएसएनएल या सरकारी कंपनीजवळ आपल्या दीड लक्ष लोकांना वेतन द्यायला पैसे नाहीत. सरकारी बँकांचे थकीत कर्ज १२ लक्ष कोटींच्या पुढे गेले आहे.}} चिंताजनक आर्थिक स्थितीची लक्षणे व्यक्त करणारा लोकमतचा अग्रलेख सरकार समर्थकांच्या डोळ्यात अंजन घालणारा  https://www.lokmat.com/editorial/indian-economy-going-down/

अर्थव्यवस्थेच्या दयनीय अवस्थेसाठी सरकारचे वाभाडे काढणारा सामना चा अग्रलेखही ठाकठीक. https://www.saamana.com/saamana-editorial-on-indian-economy-condition/

प्रहारचा अग्रलेखही देशासमोरील आर्थिक प्रश्नांचा उहापोह करून, सरकारी पातळीवरून उपायांची अपेक्षा करणारा. http://prahaar.in/a-series-of-financial-crises-worry/

पुढारीचा अग्रलेख पुन्हा एकदा पाकिस्तानच्या दुर्गतीचे जुने दळण दळतोय. आणी ही भारतद्वेषामुळे निर्माण झाली असे जुनेच प्रतिपादन त्यात आहे. त्याला समकक्ष उदाहरण म्हणून कॉंग्रेसचा एककल्ली मोदीद्वेष आणि त्यामुळे त्या पक्षाची झालेली वाताहत, हे एक ओढून ताणून आणलेलं, नाविन्यपूर्ण (!) लॉजिक हा अग्रलेख मांडतोय. https://www.pudhari.news/editorial/editorial/pudhari-editorial-24-08-2019/

पार्ले जी या बिस्किटाने गरिबापासून श्रीमंतांपर्यंत, सर्वांवर गेली ९० वर्षे गाजवलेले अधिराज्य कुणाला नाकारता येणार नाही. या कंपनीच्या कामगार कपातीची शक्यता आहे, अशी नुसती बातमी आल्यावर जी घुसळण झाली, तिचे वर्णन करणारा अप्रतिम अग्रलेख आजच्या लोकसत्तात वाचा. लेखाची मांडणी, उपमा, {{ ‘का बोभाटा झाला जी?’ असे म्हणता म्हणता जुन्या, मळलेल्या वाटा मोडून तर पडल्या नाहीत ना अशी शंका घेणे केव्हाही रास्त }} अशा वाक्याद्वारे जांभूळ पिकल्या झाडाखाली या महानोरांच्या गाण्यातील शब्दांवर साधलेला श्लेष ……. सगळंच वाचनीय.

या सार्वत्रिक जिव्हाळ्याच्या विषयासाठी आजचा निवडक अग्रलेख लोकसत्ताचाच. https://www.loksatta.com/agralekh-news/the-story-of-india-parle-g-mpg-94-1956693/

दैनिक लोकसत्ता, संपादक- गिरीश कुबेर 

**********

हा उपक्रम कसा वाटतोय हे आम्हाला जरूर कळवत जा. आपल्या सूचना, तक्रारी, आक्षेप नक्की नोंदवा. सदर अग्रलेखाबद्दल आपली प्रतिक्रिया द्या. आणि ही पोस्ट आवडल्यास नक्की शेअर करा. जेणेकरून अधिकाधिक वाचक याचा आस्वाद घेऊ शकतील.

सुधन्वा कुलकर्णी

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'फ्रिमीयम' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'फ्रिमीयम' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 5 Comments

  1. सभासदाची वर्गणी दाखविली आहे ती किती मुदतीची आहे हे काळात नाही खुलासा dgadgil09@gmail.com वर करता आल्यास करावा हि विनंती
    दिगंबर गाडगीळ

  2. उपक्रम स्तुत्य, चांगलाच आहे. वाचण्यायोग्य गोष्टींकडे लक्ष वेधले जाते.

    1. धन्यवाद

  3. कल्पना चांगली,वेळ वाचविणारी आहे.

    1. धन्यवाद

Leave a Reply

Close Menu