भाद्रपदात उमललेली प्रेमकथा – ३

सारसबाग

***

काल शार्दूलला भेटून आल्यावर ओवी अतिशय अस्वस्थ होती. शार्दूलच्या घरी जायचं या कल्पनेने तिला घाम फुटला होता. खरंतर त्यात इतकं घाबरण्यासारखं काहीच नव्हतं. शार्दूलची आई आणि ओवी यांच्यात मैत्रिणीसारखं नातं होतं. अनेकदा त्या दोघी कुठे कुठे शॉपिंगला जात असत. ओवीची चॉईस शार्दूलच्या आईला फार आवडायची. त्याच पोरीने आपल्या पोराला आयुष्याचा जोडीदार म्हणून निवडलं आहे याचीही शार्दूलच्या आईला कल्पना होती. पण पोरं हवेत जाऊ नये म्हणून ती आपल्या चेहऱ्यावर कोणतेही भाव दाखवायची नाही.

ओवी घरी आली तेव्हा घरात थोडेफार पाहुणे होते. ऋषीपंचमीची ऋषीची भाजी तिला फार आवडायची. पण आज तिला ती जास्त रुचली नाही. तिने ती कशीतरी पोटात ढकलली आणि आपल्या खोलीत गेली. खोलीचे लाईट बंद केले आणि नुसती पडून राहिली. दुरून ‘गणराज रंगी नाचतो’ चे पुसटशे स्वर तिला ऐकू येत होते.

यावर्षीच्या गणपतीत इतकं काही घडत होतं. पण ओवी आणि शार्दूलच्या पहिल्या भेटीलाही गणपतीच जबाबदार होता. आठवीपर्यंत साताऱ्याला शिकलेला शार्दूल नववीत पुण्याला आला होता. त्याच्या वडिलांना एका आयटी कंपनीत नोकरी मिळाली होती. शार्दूल लहानपणापासून हुशार होताच पण अतिशय संवेदनशील मनाचा होता. त्याच्या वागण्यात ते अजिबात दिसत नसलं तरीही आयुष्यात पुढे काय करायचं याची त्याला स्पष्ट माहिती आणि जाणीव होती.

ओवी ही अगदी पुणेकर मुलगी होती. प्रभात रोडला घर, वडिलांचा मोठा उद्योग, अभिनव शाळेत पहिलीपासून शिक्षण, कथ्थकची आवड, सवाई गंधर्वला नियमित हजेरी अशा गोष्टी तिने लहानपणापासून केल्या होत्या.

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'निवडक' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'निवडक' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

This Post Has One Comment

  1. आयटी कंपनीत नोकरी व सारसबागेजवळ मटकी भेळ म्हणजे १९९० चा सुमार. तेव्हाची नववीतली प्रभातरोडला राहणारी कारखानदाराची मुलगी पुढे समाजशास्त्रात बीए होते व माहेर मेनकात कथा लिहिते येवढे सोडले तर बाकी भट्टी जमलीये.

Leave a Reply

Close Menu