भाद्रपदात उमललेली प्रेमकथा – ४

लक्ष्मीची पावलं

***

बराचवेळ ओवी पलंगावर पडून होती. काहीवेळाने तिला झोप लागली. एक दोन तासानंतर ती अचानक दचकून जागी झाली तेव्हा सगळीकडे निजानिज झाली होती. तिने मोबाईल उघडला तेव्हा शार्दूलचे आठ मिस कॉल आणि पंधरा मेसेज दिसले. तिने शार्दूलला फोन लावला. पूर्ण रिंग वाजण्याआधीच त्याने तो उचलला.

“कुठे होतीस तू? किती फोन करतोय मी तुला”
“अरे डोळा लागला होता.” ओवी जांभयी देत उत्तरली.
“काय गं? तब्येत वगैरे बरी आहे ना?”
“हो रे. बरी आहे. खूप थकवा आलाय आणि खूप टेन्शन आलंय.”
“वेडाबाई टेन्शन कसलं घेताय एवढं. फक्त घरी यायचंय.”
“हे फक्त घरी येणं नाही. त्याला किती बाजू आहेत हे कळतंय का तुला?”
“अगं ते काही समाजशास्त्र आहे का त्याला अनेक बाजू असायला? ते फक्त शास्त्र आहे”असं म्हणून तो स्वत:च हसायला लागला.

ओवी काहीच बोलली नाही.

“हे बघ मला असं वाटतं की आत्ता ही बोलायची योग्य वेळ नाही. उद्या सकाळी मला एक तास वेळ आहे. नंतर गौरीची गडबड आहे. आपण भेटू आणि बोलू.”

ओवीने फोन ठेवला तेव्हा तिच्या डोळ्यातली झोप पूर्णपणे उडाली होती.

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'निवडक' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'निवडक' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

Leave a Reply

Close Menu