निवडक अग्रलेख – १७ सप्टेंबर २०१९

लोकसत्ता – उपयोगशून्य स्वामी https://bit.ly/2mcOsOC

साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी परवा भाजपमध्ये प्रवेश केला. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजानादेश यात्रेत ते काल सहभागी झाले.  त्या प्रसंगी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वतःचे संविधानिक पद विसरून भोसलेंना जाहीर मुजरा केला. देवेंद्र फडणवीसांनी मुजरा केला नाही पण उदयनराजेंना उद्द्येशून थेट सांगितलं की ‘‘छत्रपतींनी आदेश द्यायचा,’’

या दोन्ही कृतींवर सडकून टीका करणारा लोकसत्ताचा अग्रलेख सर्व लोकशाहीप्रेमींनी वाचावा असा आहे. आजचा निवडक अग्रलेख तोच.

कुबेरांनी घेतलेली हजेरी रास्त आहे. फक्त यातली गंमतीची बाब अशी की फडणवीस असोत की चंद्रकांत पाटील, शरद पवार असोत की राज ठाकरे, हे सगळे मुरलेले राजकारणी आहेत. आपल्या कृतीचे किंवा वक्तव्याचे काय परिणाम होणार आहेत याचा त्यांना पुरेपूर अंदाज असतो. किंबहुना इच्छित परिणाम साधण्यासाठीच ते अशी वक्तव्ये करत असतात.  अर्थात कुबेरांना हे ठाऊक नाही असे नाही. पण अग्रलेखाच्या उत्तरार्धात त्यांनी या कृतीमागील  राजकारणाची दखल घेतली असती तर हा लेख अजून खुलला असता, असं मला वाटतं. 🙂

दैनिक लोकसत्ता, संपादक- गिरीश कुबेर
***

आजचे अन्य अग्रलेख

सामना – पळपुटे कोण ? https://bit.ly/2kAMffH

तरुण भारत बेळगाव -स्नूकर-बिलियर्ड्सचा ‘सेनापती’ https://bit.ly/2mjyzWP

पुढारी – गोंधळलेला पाकिस्तान https://bit.ly/2lZsoa3

लोकमत – इम्रान खान यांचे फुत्कार https://bit.ly/2lStowO

[ सदर लेख निःशुल्क असल्याने सर्व सभासद हा वाचू शकतील. फक्त एकदा बहुविध.कॉम वर फ्री रजिस्टर करून निवडकचे सभासद व्हा. आणि अशा सर्व लेखांचा विनामुल्य आनंद घ्या. https://bahuvidh.com/category/awantar ]

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'निवडक' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'निवडक' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

Leave a Reply

Close Menu