निवडक अग्रलेख – २० सप्टेंबर २०१९

अक्षम आणि म्हणून पराभूत माणसे आपल्या अपयशाची कारणे भेदाभेदाच्या राजकारणात शोधत असतात. जातीय समीकरणातून आपल्याला नालायक ठरविले जात आहे, असे कारण अपयशानंतर समोर केले जाते. तसेच समकालीन राजकारणात मतदान यंत्रालाच सारा दोष दिला जातो आहे. अगदी गेल्या महिन्यात राज ठाकरे यांनी ‘‘एकदा ईव्हीएम गेले तर भाजपही जाईल. मतपत्रिकेद्वारे मतदान घेतलं नाही तर देशातील लोकशाही धोक्यात येईल.’’ असे विधान केले होते. त्यासाठी त्यांनी सोनिया आणि ममता यांची भेट घेतली होती. या निमित्ताने विरोधी पक्षांची एक मोट बांधण्याची संधी साधून घेण्याचा हा प्रयत्न होता, मात्र महाराष्ट्रातल्या वंचित बहुजन आघाडीपासून आप, बसपा सारखे पक्षही यापासून दूरच राहिले.

या पक्षांनी नेमके का असे केले, यावर नंतर चर्चा करू, मात्र केवळ मतदान यंत्रामुळेच निवडणुका जिंकता येतात असा विचार ‘राजकीयदृष्ट्या चूक’ आहे, हे किमान शरद पवार यांच्या सारख्या नेत्याने तरी मान्य करावे. तळागाळापर्यंत पाझरलेली कार्यकर्त्यांची फळी असते, नेतृत्व असते आणि संघटन मजबूत असावे लागते. म्हणूनच मनसेच्या स्थापनेच्या वेळी पवारांनी राज ठाकरे यांना सकाळी उठा आणि राज्यभर फिरा, असा सल्ला दिला होता. राज ठाकरे गेल्या दोन दशकात नाशिकच्या पलिकडे गेले नाहीत. पूर्ण राज्याचा दौरा कधी केला नाही अन्‌ अशा नेत्याने केवळ यंत्राने निवडणूक जिंकता येते, असे मानणे सहज आहे. मात्र ज्यांना जनता कळते, ज्यांनी पक्ष संघटना उभी केली आहे आणि आपल्या बळावर सत्ता आणली आहे, अशा मायावती, केजरीवाल, शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांना हे नक्कीच कळते की मतदानयंत्रांत छेडछाड करता येत नाही आणि केवळ यांत्रिक करामतीने सत्ता हस्तगत करता येत नाही.

आजचा निवडक अग्रलेख तरुण भारत नागपूरचा

तरुण भारत नागपूर – यंत्र सत्य की माणूस? https://bit.ly/2m4EL4F

संपादक – गजानन निमदेव 

***
आजचे अन्य अग्रलेख

लोकमत – पुन्हा देवेंद्र! https://bit.ly/2kVAkJh

सामना – तेलाची पेटवापेटवी ! https://bit.ly/2ktFNaf

प्रहार – ‘सब की सुरक्षा, सब का सम्मान’ही अपेक्षित! https://bit.ly/2m4SgkQ

[ सदर लेख निःशुल्क असल्याने सर्व सभासद हा वाचू शकतील. फक्त एकदा बहुविध.कॉम वर फ्री रजिस्टर करून निवडकचे सभासद व्हा. आणि अशा सर्व लेखांचा विनामुल्य आनंद घ्या. https://bahuvidh.com/category/awantar ]

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'निवडक' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'निवडक' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

Leave a Reply

Close Menu