fbpx

तावडे आणि मनाचं दार…

रात्री विनोद तावडे घरी आले परंतु नीट बोलले नाही, नीट जेवले नाहीत म्हणून वर्षा तावडे काळजीत होत्याच,

त्यानंतर ते नीट झोपलेसुद्धा नाही. सतत या कुशीवरुन त्या कुशीवर वळत होते.

वर्षा तावडे सतत विचारत होत्या, ‘काय झालं. झोप नीट न यायला? एवढ्या मोठ्या राज्यात अशा छोट्या छोट्या गोष्टी होतच असतात.’

तरीही तावडे झोपेनात तेंव्हा वर्षा तावडे उठल्या आणि कपाटाचं दार उघडून त्यांनी त्यातला ‘मनाला दार असतंच’ हा आपला कविता संग्रह काढला. ‘मी वाचते काही कविता, तू शांत झोप त्या ऐकत ऐकत..’ त्या तावडेंना म्हणाल्या

‘बोचरी जोडव्याची तार
येता विकासाच्या आड
तारेलाच दे वळण
मानू नकोस कधी हार’

कविता संग्रहातील या ओळी ऐकून तावडेंची झोप पारच पळाली. ‘नको गं, विकास हा शब्द सुद्धा आता मला ऐकावासा  वाटत नाही, तू झोप मनाची दारं बंद करून, माझ्यासाठी आशेचं एखादं दार उघडतं का ते पाहतो मी उद्या सकाळी.’

दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच तावडेंनी मुख्यमंत्र्यांना फोनवर गाठण्याचा प्रयत्न केला, परंतु ते नॉट रिचेबल होते. तावडे अस्वस्थ झाले, मग स्वतःशीच पुटपुटले, ‘ वर्षा…’
आतून बायको धावत आली. ‘काय हवंय? कशाला आवाज दिलास?’

तावडे म्हणाले, ‘अगं तुला आवाज नाही दिला. म्हटलं, आपण थेट ‘वर्षा’वर जाऊनच विचारावं, सकाळी सकाळीच गाठावं त्यांना.’ लगेचच तावडे उठले आणि गाडी काढून वर्षावर पोचले.
त्यांना गेटवर सुरक्षा रक्षकांनी अडवलं.

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'फ्रिमीयम' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'फ्रिमीयम' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 10 Comments

  1. मस्तच.

  2. खमंग आणि खुसखुशीत!

  3. तंबी द ग्रेट…

  4. झक्कास.. एकदम मस्त..

  5. भन्नाट. नेहमीसारखा

  6. छान लेख!

  7. आवडला.

  8. मस्त

  9. छान!!

  10. मला बहुविध चे सभासद व्हायला आवडेल

Leave a Reply

Close Menu