मराठी भाषा- तंत्र आणि मंत्र- भाग ३३

मराठीभाषा १०९प्रथितयश , मथितार्थ

प्रथ् या संस्कृत धातूचा अर्थ पसरणे , प्रख्यात होणे.

प्रथित हे त्याचे भूतकाळी रूप आहे.

प्रथित म्हणजे प्रख्यात आणि यश म्हणजे कीर्ती.

जिची कीर्ती प्रख्यात आहे अशी (व्यक्ती किंवा संस्था)

मथ् या संस्कृत धातूचा अर्थ घुसळणे, ढवळणे.

मथित हे त्याचे भूतकाळी रूप आहे.

मथित म्हणजे घुसळलेला, ढवळलेला.

मथित आणि अर्थ यांचा संधी होऊन मथितार्थ हा शब्द तयार होतो.

घुसळून काढलेला अर्थ म्हणजेच चर्चा, वाद किंवा परीक्षण ह्यांचा निष्कर्ष किंवा ह्यांचे तात्पर्य.

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'निवडक' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'निवडक' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 2 Comments

  1. छान लिहिलं आहे.

  2. खूप माहितीपूर्ण लेखन.

Leave a Reply

Close Menu