मराठी भाषा- तंत्र आणि मंत्र- भाग ३६

मराठीभाषा १२१ – मखलाशी

मूळ शब्द फारसी ‘मखलसी’ (म्हणजे मंजुरी, मान्यतेचा शेरा किंवा टीका, वादाचा निर्णय, भाष्य) किंवा अरबी ‘मुखल्लस’ (म्हणजे शुद्ध, बिनचूक).

सरकारातून दिली जाणारी इनामपत्रे, करारनामे, कौलपत्रे इत्यादी लिहून तयार झाली म्हणजे ती मंजुरीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे जातात. हे अधिकारी त्यात कमी-जास्त केल्यानंतर मंजूर केल्याची जी निदर्शक खूण स्वतःच्या हातांनी करतात त्याला ‘मखलाशी’ म्हणतात.

यावरून सुधारणा करणे, मजकुरात कमी-जास्त करून एखाद्या गोष्टीला आपल्याला हवे तसे / इष्ट स्वरूप देणे अर्थात एखादी गोष्ट गळी उतरवण्यासाठी चापलूसी करणे अशा अर्थाने मखलाशी करणे असा अर्थ रूढ झाला.

उदा. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना इतकी मोठी मदत आधी कधीच मिळत नव्हती हे सरकारने सांगितले; पण ही मदत देताना “५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसानीची” अट ठेवून सरकारने मखलाशी केली आहे; हे मात्र कुठे बोलले जात नाही.

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'निवडक' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'निवडक' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

Leave a Reply

Close Menu