लिखाणपद्धतींची ‘मिसळ’

बातमी
दादर स्टेशनसमोर एका माणसाने वडा-पाव खाल्ला.

ही बातमी विस्ताराने लिहा…

*

नवकथा

मुंबईतला कुंद, घामट उन्हाळा. दादर स्टेशनवर तो उतरला तेव्हा सकाळी घातलेला पांढराशुभ्र शर्ट घामाने पार चोळा-मोळा होऊन गेला होता. त्याला वाटलं आपलं आयुष्य देखील ह्या शर्ट सारखंच मुंबईत पहिल्यांदा आलो तेव्हा असंच परीटघडीचं होतं, गेल्या काही वर्षांत इतके धक्के खाऊन तेही लोळा-गोळा होऊन पडलंय. पाय ओढत तो पुलाकडे चालायला लागला. फलाटावरचं गोल घड्याळ जणू डोळा वटारून त्याच्याकडे रागाने बघत होतं. अचानक त्याला जाणवलं, आपल्याला खूप भूक लागलीये, पोट जाळणारी, रौद्र भूक. लहानपणी माय कामावर गेली की शाळेतून आल्यावर लागायची तशी खवळलेली भूक. तो पुलाखालच्या वडा-पावच्या टपरीवर थांबला. तिथला माणूस मोठ्या काळ्याकुट्ट कढईत वड्यांचा घाणा तळत होता. गोल, मोठ्ठाले वडे तेलात तरंगत होते. त्याला अचानक लहानपणी आजीने सांगितलेल्या नरकाच्या गोष्टीची आठवण झाली. आजी सांगायची की यमाच्या दरबारी मोठ्या कढया आहेत, उकळत्या तेलाने भरलेल्या आणि त्यात पापी माणसांना तळून काढलं जातं. पुढ्यातल्या कढईतले वडे त्याला एकदम मानवी मुंडक्यांसारखे दिसायला लागले. इतका वेळ पोट कुरतडणारी भूक नाहीशी झाली, पण आपल्या त्या सहा बाय सहाच्या खुराड्यात जाऊन काही बनवायचं त्राण त्याला नव्हतं म्हणून त्याने एक वडा-पाव घेतला आणि चार घासात संपवून टाकला.

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'निवडक' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'निवडक' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 8 Comments

  1. मस्तच..बोले तो एकदम झक्कास 👌👌

  2. Sunder,,,,Shefali mam hats off

  3. Shefali Vaidya is the author of this piece. Hope she will be mentioned in credit.

    1. १००% करणार. सोशल मीडियावरच्या अन्य लेखांचेही लेखक कळले तर बरं होईल. सध्या ते अज्ञात category त आहेत.

  4. This was written by me. Please give due credits.
    Shefali Vaidya

    1. शेफाली जी, हा लेख whatsapp वरून घेतलाय आणि त्यामुळे सोशल मीडियावरून घेतल्याचा उल्लेख त्यात आहेच. मला नेहेमीच आश्चर्य वाटत असतं की एव्हढे intelligent लेख, व्यंगचित्र, विनोद बिना लेखकाचे नाव कसे viral होतात. आज आता कळलंय तर १००% तुमच्या नावावरच तो जाईल. पुनश्चची भूमिकाच लेखकांच्या बाजूची आहे. तुमचं अजून लिखाण वाचायला आवडेल. कुठे मिळेल?

    2. goood one

  5. झकास! लेखक आहे मोठा ताकदीचा! निरनिराळ्या लेखंकाच्या शैलीचे निरीक्षण अफाट!

Leave a Reply

Close Menu