लग्नाचा बाजार :- भाग १


६४-६५ च्या सुमाराची गोष्ट. माझ्या एका मोठ्या मैत्रिणीचं लग्न जमवायचं होतं. तिचे वडील एडनला, आई हुबळीला, आजोळ नगरचं आणि ती शिकायला मुंबईत अशी चारीधाम यात्रा सुरू होती. साहजिकच लग्नासाठी मचाण बांधणं, दबा धरून बसणं वगैरे नीट जमत नव्हतं. शेवटी ‘वर पाहिजे’ची जाहिरात द्यावी असा प्रस्ताव निघाला आणि एकच गदारोळ माजला. खुद्द तिला ते अपमानकारक वाटलं, ‘इतकी का मी खपत नाहीये?’ तिनं भावनिक टिंगल आरंभली. ‘जाहिरात म्हणजे मटियार दानेदार मटियार... दोनला किलो-दोन किलो म्टल्यासारखं वाटतं. तिच्या आईनं पत्रातून गार्हाणं मांडलं. आजीनं तर आकांडतांडव केलं. ‘जाहिराती देताहेत! एकदम शंभर जणं आली म्हणजे सांगून? जळल्या, चार लुगड्यांच्या घड्या एकदम पाहिल्या तर ही घ्यावी का ती कळेनासं होतं.’ सुदैवाने किंवा दुर्दैवाने जाहिरातीतील प्रतिसाद तसा कोमटच होता, पण एका कुटुंबानं संपर्क साधला. त्यांचा मुलगा परदेशी होता आणि तो सुट्टीवर येण्यापूर्वी टोळी क्र. १ - आई-वडील व टोळी क्रमांक दोन- भाऊ-वहिनी हे मुली बघून चाळून, पाखडून ठेवणार होते. टोळी क्र. १ ला तिला दाखवायला नेलेलं असताना भलताच अनवस्था प्रसंग ओढवला. नवरा मुलगा न सही, त्याचा फोटो तरी अशी इच्छा हिनं आणि हिच्या आईवडिलांनी व्यक्त केली. ‘जा रे, जरा टेबलावरचा फोटो घेऊन ये.’ मुलाच्या आईवडिलांनी आज्ञा केली. घरातला नोकर आत गेला. झटक्यासरशी फोटो घेऊन बाहेर आला. आणि एकजात सगळ्यांचे चेहरे धडाधडा पडले. तो गांधीजींचा फोटो होता! साक्षात राष्ट्रपित्यासाठी, त्याही कैलासवासी, आपल्याला वधू नेमस्त केलं जात आहे हे बघून मैत्रिणीला जे गहिवरून आलं! 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


समाजकारण , पुस्तक पंढरी , कुटुंबसंस्था

प्रतिक्रिया

  1. Rashmi

      6 वर्षांपूर्वी

    खूपच सुंदर लेख. मनोरंजनाबरोबरच माहितीही मिळाली

  2. Jayant Gune

      6 वर्षांपूर्वी

    मला एक वधू पाहिजे जाहिरात आठवते। त्यात तरुनपणातील एखादा प्रमाद असल्यास माफ केला जाईल असं लिहिलं होतं। लेख मनोरंजक आणि उत्तम आहे।

  3. mugdhabhide

      6 वर्षांपूर्वी

    superb

  4. Hemant

      6 वर्षांपूर्वी

    I मला आवडला☺️

  5. koolamol

      6 वर्षांपूर्वी

    अफलातून लिहिलंय

  6. मनस्वी

      6 वर्षांपूर्वी

    हसुन हसुन पुरेवाट झाली...!

  7. shubhada.bapat

      6 वर्षांपूर्वी

    मंगलाताईंचा नेहमीप्रमाणेच अपेक्षापूर्ती लेख. भाग 2 ची आतुरता

  8. vivek

      6 वर्षांपूर्वी

    maja aali



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen