fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

उन्हातले दिवस

महाराष्ट्र टाइम्स नावाचे नवे मराठी दैनिक टाइम्स ऑफ इंडियाच्या मालकांनी काढले (आजच्या भाषेत ‘लॉंच’ केले.) तो काळ.

टाइम्सचे मराठी भावंड ही अपूर्वाईची गोष्ट होती.

निघते, अशी आवई उठली तेव्हापासून मराठी वाचकांत आणि विशेषत: मराठी वाचकांत आणि विशेषत: मराठी वृत्तपत्र जगतात एकच हलचल सुरू झाली. संपादक कोण होणार, कोण कोण या नव्या दमदार दैनिकात जाणार, दैनिक कसे असणार. तर्कांना ऊत आला.

तेव्हाचे महाराष्ट्राचे दिग्गज राजकारणी (दिग्गज आजचे नव्हेत, खरे. हिमालयाच्या मदतीला सह्याद्री वगैरे होऊन धावून जाणारे; तेही साक्षात, पंतप्रधान नेहरूंच्या बोलावण्यावरून) यशवंतराव चव्हाण यांच्या सल्ल्यानेच सर्व ठरत आहे असे बोलले जाऊ लागले. त्यांच्या मर्जीतील पत्रकार मंडळींची नावे घेतली जाऊ लागली.

मग नेमणुका होऊ लागल्या. संपादक व्दा. भ. कर्णिक झाले. त्याच्या हाताखाली गोविंद तळवलकर, मा. पं. शिखरे दाखल झाले. माधव गडकरी आले, दि. वि. गोखले आले. रोज नवे नवे रिकामे टेबल भरू लागले. बहुतेक सगळे मुरलेले आणि अनुभवी होते. काही नवे होते.

बोरीबंदरसमोरची टाइम्सच्या भव्य इमारतीतली नव्या दैनिकाची कचेरी बघता बघता गजबजली.

दैनिकाचे ‘डमी’ अंक निघू लागले. हे विकण्यासाठी नव्हते.

या काळात मी जवळच्या फोर्ट भागात दिवसभर भटकून तेथल्या दुकानांच्या भपकेदार शो-विंडोज बघण्यात माझा बेकारीचा काळ सुखाने वाया घालवत होतो. पाय दुखले की जवळच्या इराणी हॉटेलात ब्रून-मस्का आणि चहा मारावा की निघालो पुन्हा नव्या निरुद्देश पायपिटीला.

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

This Post Has 21 Comments

 1. मी महाराष्ट्र टाइम्स चा पहिल्या दिवसापासून हा वाचक . द्वा भ कर्णिक ह्यांचे ‘ काय सांगू तुम्हाला’ हे सदर मला आवडत असे . त्यानंतर विजय तेंडुलकर ‘ कोवळी उन्हे ‘ ह्या सदरातून भेटले . ते माझे सर्वात आवडते सदर. ‘माणूस ‘ मधील तेंडुलकरांचे ‘रातराणी ‘ सदर आवडू लागले. अशा तेंडुलकरांशी प्रत्यक्ष भेट होईल असे कधी वाटले नव्हते . अनंत भालेराव ह्यांचे ‘ कावड ‘ हे माझे आवडते सदर. मी त्याचा प्रकाशक झालो. विजय तेंडुलकरांच्या हस्ते प्रकाशन केले . त्यावेळपासून आमची ओळख झाली. माझे ऑफिस पार्ल्यात मालवीय रोडवर . तेंडुलकर जवळच रहात . आमच्या भेटी होऊ लागल्या . एका भेटीत मी ‘ रामप्रहर ‘ बद्दल विषय काढला . त्यांनी मला कात्रणाची फाईल वाचायला दिली . मी वाचल्यानंतर पुस्तक काढूयात असे सुचविले . ते लगेच हो म्हणाले . मी ‘ रामप्रहर ‘ प्रकाशीत केले. त्यांच्याशी मैत्री वाढत गेली. मटाकरीता ते ‘ पेशा लेखकाचा ‘ हे सदर लिहू लागले. त्याचे डीटीपीचे काम आमच्या ऑफिस मध्ये होत असे. मीच पहिला वाचक होतो. गोविंद तळवलकरांनी त्यांचा एक लेख छापला नाही. तेंडुलकरांनी सदर बंद केले. एका चांगल्या सदर लेखन असलेल्या पुस्तकाला आपण मुकलो. ज्या मटामुळे त्यांनी ‘ कोवळी उन्हें ‘ लिहून सुरुवात केली त्याच मटा मुळे त्यांचे ‘ पेशा लेखकाचा ‘ हे सदर लिहिता लिहिता बंद झाले. मटाने सुरुवात व मटामुळेच बंद.

 2. छान!

 3. मस्त !
  या प्रतिभाशाली व्यक्तिच्या सुरवातीच्या काळातील संघर्ष माहित नव्हता.

 4. Aflatoon!

 5. प्रत्येक लेखावर फुकट लेख विकायचा लेख असे वाजंत्री वाजवत सांगणे गरजेचे आहे का? प्रत्येकाच्या प्रोफाइल वर त्याची सूची दयावी नि काय फुकट नि काय विकत हे सहजगत्या लेख वाचण्याच्या ओघात नकळत व्हावे अशी काहीसी सोय करता येणे शक्य आहे

 6. अत्यंत प्रवाही आणि सहज व्यक्त होत जाणारी, वर्तमान पत्रामधल्या एका सदराची जन्मकथा मनाचा ठाव घेते. पुर्णपणे एकसंध वाचल्या वर एखादा प्रतिभावंत लेखक पदवीधर असेलच असा गैरसमज असला तर तो नकळत निघून जातो. छान लेख.

 7. Khup chhan

 8. सगळ्चेयां अभिप्राय वाचले,माझेच वाटले. कारण मीही या लेखनाचा नियमित वाचक होतो. खरंच कोवळ्या उन्हात बसून आपला दोस्त गप्पा मारतोय असे वाटायचे. तरीही हे यांना कसे सुचते, असेही वाटायचे. त्या लेखनाची जन्मकथा वाटचाल आणि अखेर खूप भावली.

 9. लाजवाब
  मस्तच आहे
  बेकार माणसाची घालमेल मस्त टिपली आहे
  सुरुवातीला मटा खूप आवडायचा १९६९चा काळ असावा
  सांठवून ठेवणारे दिवस होते
  –शरद कांबळे धुळे

Leave a Reply

Close Menu