उन्हातले दिवस


महाराष्ट्र टाइम्स नावाचे नवे मराठी दैनिक टाइम्स ऑफ इंडियाच्या मालकांनी काढले (आजच्या भाषेत ‘लॉंच’ केले.) तो काळ. टाइम्सचे मराठी भावंड ही अपूर्वाईची गोष्ट होती. निघते, अशी आवई उठली तेव्हापासून मराठी वाचकांत आणि विशेषत: मराठी वाचकांत आणि विशेषत: मराठी वृत्तपत्र जगतात एकच हलचल सुरू झाली. संपादक कोण होणार, कोण कोण या नव्या दमदार दैनिकात जाणार, दैनिक कसे असणार. तर्कांना ऊत आला. तेव्हाचे महाराष्ट्राचे दिग्गज राजकारणी (दिग्गज आजचे नव्हेत, खरे. हिमालयाच्या मदतीला सह्याद्री वगैरे होऊन धावून जाणारे; तेही साक्षात, पंतप्रधान नेहरूंच्या बोलावण्यावरून) यशवंतराव चव्हाण यांच्या सल्ल्यानेच सर्व ठरत आहे असे बोलले जाऊ लागले. त्यांच्या मर्जीतील पत्रकार मंडळींची नावे घेतली जाऊ लागली. मग नेमणुका होऊ लागल्या. संपादक व्दा. भ. कर्णिक झाले. त्याच्या हाताखाली गोविंद तळवलकर, मा. पं. शिखरे दाखल झाले. माधव गडकरी आले, दि. वि. गोखले आले. रोज नवे नवे रिकामे टेबल भरू लागले. बहुतेक सगळे मुरलेले आणि अनुभवी होते. काही नवे होते. बोरीबंदरसमोरची टाइम्सच्या भव्य इमारतीतली नव्या दैनिकाची कचेरी बघता बघता गजबजली. दैनिकाचे ‘डमी’ अंक निघू लागले. हे विकण्यासाठी नव्हते. या काळात मी जवळच्या फोर्ट भागात दिवसभर भटकून तेथल्या दुकानांच्या भपकेदार शो-विंडोज बघण्यात माझा बेकारीचा काळ सुखाने वाया घालवत होतो. पाय दुखले की जवळच्या इराणी हॉटेलात ब्रून-मस्का आणि चहा मारावा की निघालो पुन्हा नव्या निरुद्देश पायपिटीला. जवळच टाइम्सच्या इमारतीत नवे मराठी दैनिक निघत होते त्याच्या बातम्या उडत उडत कानावर होत्या. एकदा त्याच भागात होतो तर संपादक झालेल्या व्दा. भ. कर्णिकांना भेटावे आणि संपादक झाल्याबद्दल अभिनंदन करावे असे वाट ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


कोवळी उन्हे , महाराष्ट्र टाईम्स , विजय तेंडुलकर

प्रतिक्रिया

  1. mukund parelkar

      6 वर्षांपूर्वी

    aapuli aapan karee stutee to ek murkh ----------- SANT RAMDAS PLEASE GIVE YOUR EMAIL SO THAT i CAN WRITE IN PRIVATE.

  2. Dr Narendra Gangakhedkar

      6 वर्षांपूर्वी

    मी महाराष्ट्र टाइम्स चा पहिल्या दिवसापासून हा वाचक . द्वा भ कर्णिक ह्यांचे ‘ काय सांगू तुम्हाला’ हे सदर मला आवडत असे . त्यानंतर विजय तेंडुलकर ‘ कोवळी उन्हे ‘ ह्या सदरातून भेटले . ते माझे सर्वात आवडते सदर. ‘माणूस ‘ मधील तेंडुलकरांचे ‘रातराणी ‘ सदर आवडू लागले. अशा तेंडुलकरांशी प्रत्यक्ष भेट होईल असे कधी वाटले नव्हते . अनंत भालेराव ह्यांचे ‘ कावड ‘ हे माझे आवडते सदर. मी त्याचा प्रकाशक झालो. विजय तेंडुलकरांच्या हस्ते प्रकाशन केले . त्यावेळपासून आमची ओळख झाली. माझे ऑफिस पार्ल्यात मालवीय रोडवर . तेंडुलकर जवळच रहात . आमच्या भेटी होऊ लागल्या . एका भेटीत मी ‘ रामप्रहर ‘ बद्दल विषय काढला . त्यांनी मला कात्रणाची फाईल वाचायला दिली . मी वाचल्यानंतर पुस्तक काढूयात असे सुचविले . ते लगेच हो म्हणाले . मी ‘ रामप्रहर ‘ प्रकाशीत केले. त्यांच्याशी मैत्री वाढत गेली. मटाकरीता ते ‘ पेशा लेखकाचा ‘ हे सदर लिहू लागले. त्याचे डीटीपीचे काम आमच्या ऑफिस मध्ये होत असे. मीच पहिला वाचक होतो. गोविंद तळवलकरांनी त्यांचा एक लेख छापला नाही. तेंडुलकरांनी सदर बंद केले. एका चांगल्या सदर लेखन असलेल्या पुस्तकाला आपण मुकलो. ज्या मटामुळे त्यांनी ‘ कोवळी उन्हें ‘ लिहून सुरुवात केली त्याच मटा मुळे त्यांचे ‘ पेशा लेखकाचा ‘ हे सदर लिहिता लिहिता बंद झाले. मटाने सुरुवात व मटामुळेच बंद.

  3. rrajan

      6 वर्षांपूर्वी

    छान!

  4. shailesh71

      6 वर्षांपूर्वी

    मस्त ! या प्रतिभाशाली व्यक्तिच्या सुरवातीच्या काळातील संघर्ष माहित नव्हता.

  5. prakash.joshi

      6 वर्षांपूर्वी

    Aflatoon!

  6. Devendra

      6 वर्षांपूर्वी

    प्रत्येक लेखावर फुकट लेख विकायचा लेख असे वाजंत्री वाजवत सांगणे गरजेचे आहे का? प्रत्येकाच्या प्रोफाइल वर त्याची सूची दयावी नि काय फुकट नि काय विकत हे सहजगत्या लेख वाचण्याच्या ओघात नकळत व्हावे अशी काहीसी सोय करता येणे शक्य आहे

  7. Sudhakar Nijam.

      6 वर्षांपूर्वी

    अत्यंत प्रवाही आणि सहज व्यक्त होत जाणारी, वर्तमान पत्रामधल्या एका सदराची जन्मकथा मनाचा ठाव घेते. पुर्णपणे एकसंध वाचल्या वर एखादा प्रतिभावंत लेखक पदवीधर असेलच असा गैरसमज असला तर तो नकळत निघून जातो. छान लेख.

  8. smanisha

      6 वर्षांपूर्वी

    Khup chhan

  9. Suresh Johari

      6 वर्षांपूर्वी

    खूप छान आहे हे

  10. vasant deshpande

      6 वर्षांपूर्वी

    सगळ्चेयां अभिप्राय वाचले,माझेच वाटले. कारण मीही या लेखनाचा नियमित वाचक होतो. खरंच कोवळ्या उन्हात बसून आपला दोस्त गप्पा मारतोय असे वाटायचे. तरीही हे यांना कसे सुचते, असेही वाटायचे. त्या लेखनाची जन्मकथा वाटचाल आणि अखेर खूप भावली.

  11. sharadbhau

      6 वर्षांपूर्वी

    लाजवाब मस्तच आहे बेकार माणसाची घालमेल मस्त टिपली आहे सुरुवातीला मटा खूप आवडायचा १९६९चा काळ असावा सांठवून ठेवणारे दिवस होते --शरद कांबळे धुळे

  12. vbakkar

      6 वर्षांपूर्वी

    Khupp mast watla lekh vachun

  13. Deshpande Anita

      6 वर्षांपूर्वी

    सुन्दर लेख,सदरनिर्मितीमागची गोष्ट आवडली.

  14. माधव कुलकर्णी

      6 वर्षांपूर्वी

    ही तर लेखकाच्या जन्माची कथा! उन्हा सारखी तेजस्वी आणि जन्मानं कोवळी!

  15. rahul

      6 वर्षांपूर्वी

    chan

  16. Chaitrali_Menkar

      6 वर्षांपूर्वी

    सुंदर लेख, हे सदर नाही मिळाले वाचायला. पण त्याच्या निर्मितीची गोष्ट आवडली.

  17. RaviTorne's writings

      6 वर्षांपूर्वी

    maze awadate sadar ani tyache pustak yancha parichay awadala.

  18. Meenal Y Ogale

      6 वर्षांपूर्वी

    खूप सुंदर प्रस्तावना आहे.मी महाराष्ट्र टाईम्सची सुरूवातीपासूनची वाचक आहे,तेंडूलकरांचे सहजसुंदर शैलीदार लेखन आवडते

  19. juhu shalimar

      6 वर्षांपूर्वी

    Every father remembers the birth of his child with excitement. But Tendulkar finds the emotional swings attached to the excitement so easily, so honestly, it is truly remarkable!

  20. अनिता ठाकूर.

      6 वर्षांपूर्वी

    मीहि आधी कोवळी उन्हे वाचायची , मग बाकीचा पेपर . हलकेफुलके, खुसखुशीत लेख असायचे त्यातले. रस्त्यावरुन जाणा-या लहान मुलांना लोकरीचे रंगीबेरंगी गुंडे म्हंटलेलं अजून आठवतंय.

  21. bookworm

      6 वर्षांपूर्वी

    क्या बात है! कोवळी उन्हे चे हे 'मेकींग' आवडलं.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen