आणीबाणी उठल्यावर नियतकालीकांवरील निर्बंध उठले. पुढच्याच महिन्यात ‘माणूस’चा ‘जनविराट’ विशेषांक निघाला. त्या अंकात विनय हर्डीकर यांचा एक दीर्घ लेख होता. त्या लेखांवरील प्रतिक्रियांनी उत्साहित होऊन श्रीगमानी या पुस्तकाचा घाट घातला. पुस्तकाचे नाव होते ‘जनांचा प्रवाहो चालिला..‘. पुस्तक प्रकाशित झाल्यावर चांगल्या वाईट कारणांनी ते चर्चेत राहिले. पण आजही आणीबाणीवरील भाष्य म्हटले की याच पुस्तकाचे नाव सर्वप्रथम येते. त्या पुस्तकातील शेवटचे प्रकरण येथे देत आहोत.
आणीबाणी संपली. निवडणुका झाल्या. त्यात इंदिरा गांधी पराभूत झाल्या. हुकुमशाहीचा अंत झाला. व्यक्तीस्वातंत्र्याची पहाट पुन्हा एकदा उगवली. पण म्हणजे देशाच्या सर्व समस्या संपल्या का ? इंदिरा कॉंग्रेसचा दारुण पराभव हा केवळ इंदिरा गांधींचा पराभव आहे का ? आणि त्याला केवळ त्याच कारणीभूत आहेत का ? एक व्यक्ती वा समाज म्हणून, काँग्रेसअंतर्गत बळावलेल्या दोषांना आपणही जबाबदार नाही का ? जनता पक्षाच्या प्रचंड विजयाच्या क्षणी देखील, त्यात वाहून न जाता, दोन्ही बाजूंचा समतोल विचार करणारा विनय हर्डीकर यांचा हा लेख-
********
आज मी अतिशय आनंदात आहे. आजच का, गेला एक-दीड दिवस अतिशय आनंदाचाच गेलेला आहे. मीच एकटा आनंदात नाही, माझ्यासारखे अनेक भारतीय नागरिक एका वेगळ्याच आनंदाचा अनुभव घेताहेत याची मला खात्री आहे. काल संध्याकाळपासून, परवा संध्याकाळपासून आम्ही सारे आनंदात आहोत, गातो आहोत, नाचतो आहोत. निवडणुकांचे निकाल येत असताना रात्रभर जागलो आहोत. आता निकाल संपत आलेले आहेत. जनता पक्षाला २७१ जागा मिळाल्या आहेत. अजून एक जागा मिळाली की स्पष्ट बहुमत मिळेल! ती जागा नक्की येईल ना, अशी शंका मला मधूनच येत आहे. काँग्रेसच्या जागा १५० च्या आसपासच आहेत. त्यात वाढ होत नाही, होणार नाही हे दिसत आहे. कालच इंदिरा गांधी पडल्या, संजय पडला, त्यांचे साथीदार पडले! मंत्री तर किती पडले ते आम्ही मोजायचंच सोडून दिलेलं आहे.
asmitaph
23 Jul 2018उत्तम लेख.
asiatic
7 Jul 2018फारच छान. भावपूर्ण तरीही समतोल. आपल्या समाजातील दोष आजही तसेच नव्हे वाढलेले आणि सुन्न करणारे.
Shubhada Bodas
17 Jun 2018जुन्या आठवणी जाग्या झाल्या, पण ह्यातून आपण काहीच शिकलो नाही हेही लक्षांत आलं.
VINAYAK BAPAT
14 Jun 2018BEST OF ONE.
Vrushali2112
14 Jun 2018उत्तम माहितीपर लेख..
PrachiDamle
13 Jun 2018सुंदर लेख
mikund parrlkar
12 Jun 2018पण पुन्हा काॅग्रेस निवडून आली. कांद्याचे भाव वाढले म्हणून परत इंदिरा गांधीना निवडून दिले. ही सामान्य जनतेची अक्कल. मग कधी कधी हिटलर म्हणत होता तेच खरे वाटते. ” सामान्य जनतेच्या हातात राज्यकर्ता निवडून देण्याची शक्ती देणे हा मूर्खपणा आहे.
त्यानंतर आतापर्यत अतोनात भ्रष्टाचार झाला पण जातीपातीत अडकलेली जनता जातवाल्याना मते देत राहिली
Asmita gandgi
12 Jun 2018विचार करायला लावणारा लेख आहे.
Meenal Ogale
11 Jun 2018एक उत्तम आणि समयोचित लेख.जनता पक्षाचे पुढे काय झाले ते सर्वज्ञात आहे.एका चळवळीच्या झालेल्या अंताबद्दल वाटलेले हळहळ लेखकाच्या समतोल विचारसरणीची साक्ष देते.वाचनीय लेख.
vasant deshpande
11 Jun 2018फार छान लेख आहे . विजयाच्या क्षणी जबाबदारीची जाणीव होणं हे विचारी मनाचं लक्षण आहे. त्याबद्दल हर्डीकरांचं करावं तेवढं कौतुक थोडेच ठरेल. पण त्याच बरोबर इंदिरागांधींचा पराभव झाला ही बातमी कळली , त्या क्षणाचा विलक्षण आनंद ज्या ज्या वेळी तो विषय निघतो त्या त्या वेळी आठवल्या शिवाय राहत नाही, हेही सत्य विसरता येत नाही. मी प्रवासात होतो, इंदूरला आमची ट्रेन थांबली होती आणि ध्वनिवर्धकावरून बातमी आली तेव्हा एकच जल्लोष झाला. शेजारी उभ्या असलेल्या माणसाने एकदम मिठी मारली. ना आम्ही ओळखीचे ना देखीचे, पण आम्ही जे मानसिक क्लेश सोसले होते ते सारे क्षणात दूर झाले अशी जणू त्यावेळी सुखद जाणीव झाली.
पुढे काही दिवसांनी जयवंत दळवी यांनी लिहिलेली जयप्रकाजींची आठवण वाचली आणि उलगडा झाला. त्यांना भेटायला दळवी गेले होते तेव्हा ते काय बोलताहेत हे ऐकण्याकरिता दळवींना आपले कान त्यांच्या तोंडाशी न्यावे लागले,इतके जे.पी. अशक्त झाले होते, नव्हे केले गेले होते. ते म्हणाले, “प्रत्येकाच्या कानात सांग आणीबाणी वाईट आहे, म्हणजे ती उठवावी लागेल .” दळवीनी पुढे लिहिले होते, मला वाटले म्हातारबुवांना भ्रम झालाय. पण नंतर गावात गेलो, तेव्हा बांधाबांधावर खेडूत एकमेकांना तेच सांगत होते.तेव्हा कळले की जनमानसाने जेपींसारख्या तपस्व्याचे ऐकले होते. ही सार्वजनिक भावनााच मला मिठी
मारणाा-या अनोख्या प्रवाशाने माझ्यापर्यंत पोहोचविली होती. आज हा लेख देऊन तुम्ही पुनःप्रत्ययाचा आनंद मिळवून दिलात. धन्यवाद.