पेशवाईतील पदव्या आणि दळणवळण

पुनश्च    वि. स. कामत    2018-08-27 19:00:50   

पेशवाईत बहुमानाच्या पदव्या देण्यात येत असत व त्या घेऊन लोक स्वत:स बहुमानास्पद समजत. काही पदव्यांची नावे अशी :- हिंदूराव, हिम्मतराव, समशेर बहादूर, वजारतमा आब, सेनापती, सेनाखासखेल, सेनासाहेब सुभे, सेनाधुरंधर, धुरंधर समशेर बहाद्दर, फत्तेजंगबहाद्दर, सर्फजंगबहाद्दर, सरलष्कर, सेनावार हजारी इत्यादी. मात्र या पदव्या बहुधा भरीव असत. म्हणजे पदवीबरोबर प्राय: जहागीर किंवा वतन काहीतरी साध्य होई. पदवीदानाचा खर्च मात्र पदवी दिलेल्या लोकांकडून घेत नसत. इतमाम सांभाळला जावा अशी सरकारकडूनच तजवीज होई. अंक- नवनीत; वर्ष- फेब्रुवारी १९६९   विठ्ठल शिवदेव यास तास वाजविण्याचे घड्याळ बाळगण्याची परवानगी होऊन त्याचबरोबर घड्याळजी म्हणजे तास वाजविणारा याची नेमणूक सरकारातून करून दिली होती. पालखीचा खर्च आणि भोईलोकांचा पगार सरकारातून मिळे. सन १७५३-५४ साली अखेराज नाइक नावाच्या वंजारी लमाणास नगारा व निशाण बाळगण्याची परवानगी देण्यात आली. त्याचे काम बैलांच्या तांड्यावरून धान्याचा व्यापार व मुलुखात आमदरफती करण्याचे होते. कोणास अबदागिरीचा व मशालीचा मान दिल्यास त्यास अबदागीर धरणाराचा व दिवट्याचा पगार दिला जाई. तसेच चवरी दिल्यास चवरीखर्च मिळत असे. पेशव्यांच्या अमदानीत बरोबर पैसाअडका घेऊन राजमार्गाने दूरचा प्रवास निर्भयपणे करता येत असे. ‘‘काठीला सोने बांधून काशीपासून रामेश्वरापर्यंत खुशाल जावे’’ असे लोक म्हणत असत. पेशवाईच्या काळी या अर्थाने सुराज्य अस्तित्वात होते असे दिसते. सवाई माधवरावांच्या कारकिर्दीस उद्देशून बखरकार लिहितो- ‘‘श्रीमंत सवाई माधवरावांनी अवतार धारण केल्यापासून अलीकडे रस्त्यांनी पुण्यापासून दिल्लीपावेतो लाखो रुपयांचा जिन्नस सोने, रुपे व जवाहीर घेऊन गेले असता मार्गा ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


इतिहास

प्रतिक्रिया

  1. TINGDU

      6 वर्षांपूर्वी

    छान माहिती मिळाली.

  2. vrudeepak

      6 वर्षांपूर्वी

    अतीशय सुंदर माहितीपूर्ण लेख. केवळ लश्करी सामर्थ्याच्या जोरावर नव्हे तर उत्कृष्ट प्रशासकीय व्यवस्थेमुळे मराठ्यांनी १६५० ते १७०० ह्या काळात भारतीय राजकारणावर वर्चस्व गाजवले.

  3. Shashi177

      6 वर्षांपूर्वी

    छान लेख

  4. Namratadholekadu

      6 वर्षांपूर्वी

    खूपच छान माहितीपूर्ण लेख. पेशवेकालीन डाक परंपरेचा रंजक इतिहास समजला. धन्यवाद

  5. suresh johari

      6 वर्षांपूर्वी

    खूप छान आणि माहितीपूर्ण लेख

  6. Asmita

      6 वर्षांपूर्वी

    माहितीपूर्ण लेख. आवडला.

  7. bookworm

      6 वर्षांपूर्वी

    पेशवाईचा रंजक इतिहास!

  8. Makarand

      6 वर्षांपूर्वी

    वा, पेशव्यांनी जेवणावळीत राज्य घालवलं असा प्रचार करणाऱ्यांना हे माहितच नाहिये की त्यांनी आधी राज्य मिळवलं,ते राखलं,वाढवलं. पेशवाईतील टपाल सेवा स्वातंत्र्यानंतरच्या टपालसेवेपेक्षा अधिक कार्यक्षम होती तर. छान माहिती मिळाली.

  9. gondyaaalare

      6 वर्षांपूर्वी

    सोपी पण एकदम हमखास यशस्वी होईल अशी पद्धत .



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen