इतरांनी कशाला उठाठेव करावी?


आपण भारतीय तसे एकमेकांना ‘बघून घेण्यात’ पटाईतच आहोत. कोणीच कोणाला बघून घेण्याची एकही संधी सोडत नाही, त्यालाच तर भारतात ‘एकात्मिक विकास’ असं म्हणतात. साधा आफिसातला शिपाईसुध्दा त्याच्या साहेबाला ‘बघून घेत’ असतो. म्हणजे साहेबानं जर म्हटलं की पाणी घेऊन ये, तर तो बराचवेळ टाइमपास करून, साहेबाचा घसा जोवर कोरडा पडत नाही तोवर पाणी घेऊन जात नाही. ‘एवढा वेळ का केला’ असं साहेबांनी आवाज चढवून समजा विचारलंच तर, ऑफिसात किती काम आहे, मी एकटाच काय काय करू, रोज घरी जायला उशीर होतो मला, असं गाऱ्हाणं लावतो. साहेब बिचारा त्याला ‘ठिक आहे’ म्हणून फुटवतो, कारण सगळी कारणं खरीच असतात. शिपाई गालातल्या गालात हसत मनातल्या मनात म्हणतो, ‘मला ओरडतोस का लेका? बघूनच घेतो तुला.’ ‘बघून घेतो’चा हा अनुभव आपल्या समाजात अगदी शालेय पातळीपासून येतो. एकेकाळी शाळेत ढ विद्यार्थी हा शिक्षकांसाठी आव्हान असे, आता तो संधी असतो. लगेचच शिक्षक संबंधित पाल्याच्या पालकाला निरोप पाठवतो, ‘तुमचा पाल्य अमूक तमूक विषयात कच्चा आहे, त्याला माझी शिकवणी लावा’. शिक्षकानं बायकोला आधीच सांगितलेलं असतं, दहा मुलं कच्ची आहेत आणि दहा मुलं पक्की असूनही त्यांच्या पालकांना शिकवणी हवी आहे. वीस  मुलांचे मिळून महिना दहा हजार रूपये येतील. बायकाने त्या दहा हजारांच्या खर्चाचा हिशेब करून ठेवलेला असतो.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


विनोद , तंबी दुराई

प्रतिक्रिया

  1. Hemant Marathe

      3 वर्षांपूर्वी

    अतीशय छान, खोचक पण न टोचणारे लिखाण.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen